Delhi Police Dainik Gomantak
देश

मुलींना मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाची कारवाई, पोलिसांकडे मागितला रिपोर्ट

Delhi Police: दिल्लीत ट्यूशन शिक्षकाने दोन मुलींना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Commission For Women: दिल्लीत ट्यूशन शिक्षकाने दोन मुलींना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील भालसवा डेअरी भागातील आहे. आता या घटनेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून अहवाल मागवला आहे. पीडित मुलींच्या वडिलांनी दिल्ली महिला आयोगाला सांगितले की, 'माझ्या दोन मुली शेजारच्या एका शिक्षकाकडून ट्यूशन घेतात. 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दोघीही ट्यूशनवरुन घरी आल्या तेव्हा त्यांनी मला सांगितले की, आज सरांनी आम्हाला खूप मारहाण केली आहे. असे म्हणत त्या रडू लागल्या.'

मुलींच्या वडिलांनी पुढे सांगितले की, 'यादरम्यान एक मुलगीही बेशुद्ध झाली. मारहाणीचे कारण मी पुन्हा विचारले असता, गृहपाठ पूर्ण न केल्याने आम्हाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुलींनी पुढे सांगितले की, सरांनी आम्हाला एका खोलीत बंद केले आणि प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली.'

दुसरीकडे, हे प्रकरण समोर आल्यानंतर महिला आयोगाने दखल घेत दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला. आयोगाने आरोपींच्या अटकेच्या स्थितीसह एफआयआरची प्रत मागितली आहे. आयोगाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल 6 सप्टेंबरपर्यंत देण्यास सांगितले आहे.

तसेच, या प्रकरणाबाबत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, 'ही एक भयंकर घटना आहे. एखादा शिक्षक या लहान मुलींना एवढ्या निर्दयीपणे कसा मारहाण करु शकतो? या प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना अटक करावी. याप्रकरणी कठोर कारवाई करावी.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT