ममता बॅनर्जींना HC चा दणका, CBI करणार शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी

Mamata Banerjee: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

Teacher Recruitment Scams: शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी सीबीआय करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. खरे तर, शिक्षक भरती प्रकरणाची सीबीआय (Central Bureau Of Investigation) चौकशी करण्याच्या एकल खंडपीठाच्या आदेशावर कोलकता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केला.

त्याचवेळी, न्यायमूर्ती सुब्रत तालुकदार आणि न्यायमूर्ती लपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एकल खंडपीठाला तपासावर देखरेख करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी, न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्राथमिक शिक्षक भरती प्रकरणात कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हाच आदेश कायम ठेवत न्यायमूर्ती सुब्रत तालुकदार आणि न्यायमूर्ती लपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणातील व्यवहाराची आवश्यकता असेल तेव्हा चौकशी केली जाईल.

दरम्यान, पश्चिम बंगाल प्रायमरी स्कूल बोर्डकडून एका अतिरिक्त गुणाच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या 269 व्यक्तींना त्यांच्या नोकरीतून काढून टाकण्याचा एकल खंडपीठाचा आदेश या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत लागू राहील, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com