त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्याचे राज्यपाल एस.एन.आर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. मात्र, देव यांनी कोणत्या कारणांसाठी राजीनामा दिला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
त्रिपुरामध्ये पुढील वर्षी म्हणजे मार्च 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर शेवटची विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2018 मध्ये झाली होती. त्रिपुरामध्ये (Tripura) 60 सदस्यांची विधानसभा आहे. 43 टक्के मतांसह, भाजपने (BJP) राज्यात प्रथमच 36 जागा जिंकून सरकार स्थापन केले आणि तेथील प्रदीर्घ डाव्या राजवटीचा अंत केला. त्या निवडणुकीत डाव्या पक्षांना केवळ 16 जागा मिळाल्या होत्या.
तसेच, बिप्लब कुमार देव यांच्या राजीनाम्यावर तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) खरपूस समाचार घेतला आहे. तृणमूल काँग्रेसने ट्विट करुन म्हटले आहे की, 'बिप्लब कुमार देव त्रिपुराच्या जनतेच्या आपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांनी आधीच खूप नुकसान केले आहे. त्यामुळेच त्यांच्या निष्क्रियतेवर पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही नाराज झाले.' त्रिपुरामध्ये टीएमसीच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप नेतृत्व अस्वस्थ झाल्याचेही बोलले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.