Woman Dainik Gomantak
देश

Triple Talaq: तिहेरी तलाक पीडितेने हिंदू म्हणून घेतले सात फेरे, अन्...

Triple Talaq Victim: रुबिनाची पुष्पा बनलेल्या या महिलेने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले.

दैनिक गोमन्तक

Muslim Conversion To Hindu: रुबिनाची पुष्पा बनलेल्या या महिलेने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक रामपूरमध्ये राहणारी रुबीना आणि हल्द्वानीमध्ये राहणारा शोएब यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांनाही 3 मुले आहेत. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये वाद वाढू लागले. रुबिनाचा नवरा तिच्यावर संशय घेत असे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पाच वर्षांपूर्वी रुबीनाची प्रेमपालशी भेट झाली आणि दोघांच्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते कळलेच नाही. दरम्यान, वाद सुरु असतानाच शोएबने रुबीनाला घटस्फोट (Divorce) दिला. यानंतर रुबिना पुन्हा संसाराची स्वप्ने रंगवू लागली.

धर्मांतर करण्याचा निर्णय

रिपोर्टनुसार, प्रेमपालसोबत लग्न करण्यासाठी रुबिनाने धर्म परिवर्तन केले. आता रुबिनाची ती पुष्पा देवी बनली. या दोघांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली येथे हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. दोघांनी सात फेरे घेतले. पुष्पा बनलेल्या रुबिनाने भूतकाळाला गूडबाय करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

आनंदाने जगायचे आहे

पहिले लग्न तिच्या मनाप्रमाणे करुनही तिला खूप त्रास सहन करावा लागला, मग तो शारीरिक असो वा मानसिक छळ. मात्र आता रुबिनाने आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली. रुबिनाने जुन्या सगळ्या वाईट आठवणी पुसून टाकल्या आणि आपले पुढचे आयुष्य आनंदात घालवण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT