CBI
CBI Dainik Gomantak
देश

ममता बॅनर्जींना CBI चा 'जोर का झटका'; TMC नेत्याला चिटफंड घोटाळ्याप्रकरणी अटक

दैनिक गोमन्तक

Chit Fund Scam: चिटफंड घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करत केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला अटक केली. कोलकाता येथे ऑक्टोबर 2018 मध्ये दाखल झालेल्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने हलीशहर नगरपालिकेचे अध्यक्ष राजू साहनी यांना अटक केली आहे.

दरम्याम, सीबीआयच्या (CBI) एका अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले की, “आम्ही 80 लाख रुपये, जिवंत काडतुसे, बंदुका आणि मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याला पॉन्झी घोटाळ्याच्या चौकशीत अटक करण्यात आली आहे.''

दुसरीकडे, साहनी आणि इतरांनी सन्मार्ग वेल्फेअर ऑर्गनायझेशन नावाच्या कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. टीएमसी (TMC) नेत्याला अटक करण्यापूर्वी एजन्सीने त्याच्या घरावर छापा टाकला होता. यापूर्वी याच प्रकरणात सीबीआयने बर्दवान नगरपालिकेचे अध्यक्ष प्रणव चॅटर्जी यांनाही अटक केली होती.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनमार्ग वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या विश्वस्तांवर मुदतपूर्तीची रक्कम परत न करणे, गुंतवणूकदारांची फसवणूक करणे, शाखा बंद करणे आणि पळून जाणे असे आरोप आहेत.

तसेच, या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये सौम्यरुप भौमिक, चंद्रशेखर सबत, ब्रिजो गोपाल दत्ता, तुफान पॉल आणि सुरजित सरकार यांचा समावेश आहे. मे 2014 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशातील (Odisha) सर्व पॉन्झी घोटाळ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या घोटाळ्यातून लाखो ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT