Transman Gives Birth To Baby
Transman Gives Birth To Baby Dainik Gomantak
देश

Kerala Trans Couple Baby: अनोखे! ट्रान्सजेंडर कपलने दिली गुडन्यूज, गोंडस बाळाला जन्म,देशात पहिल्यांदाच घडलं असं!

दैनिक गोमन्तक

Transman Gives Birth To Baby: उत्तर केरळमध्ये ट्रान्सजेंडर जोडी जहाद आणि जिया पावल यांनी बुधवारी  एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. याची माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे.  जहाद बाळाला जन्म देणारा पहिला ट्रांसमॅन ठरला आहे. 

बुधवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला जहादने शासकीय रुग्णालयात बाळाचा जन्म दिला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जिया पावल यांनी सांगितले की, सकाळी ९.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळाचा जन्म झाला. 

जियाने सांगितले की, मूल आणि तिचा जोडीदार जहाद दोघेही निरोगी आहेत. तसेच या जोडप्याने नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की त्यांना बाळाचा लिंग उघडपणे सांगायचे नाहीय.

  • पालक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले

जहाद आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे जियाने नुकतेच इन्स्टाग्रामद्वारे जाहीर केले होते. जियाने एका इंस्टा पोस्टमध्ये लिहिले की, " माझे आई बनण्याचे स्वप्न आणि त्याचे वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहोत." आठ महिन्यांचे बाळ आता पोटात आहे.  बाळाला जन्म देणारे भारतातील पहिले ट्रांसमॅन ठरले आहेत. 

जिया आणि जहाद गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत असल्याची माहितीही पोस्टमध्ये देण्यात आली आहे. मार्चमध्ये त्यांचे मूल या जगात येईल, अशी अपेक्षा दाम्पत्याला असली तरी महिनाभरापूर्वी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. 

ट्रान्स मॅनने मुलाला जन्म कसा दिला?

या जोडप्याने शस्त्रक्रियेद्वारे लिंग बदलले होते. जन्माने पुरुष असलेल्या जियाने महिला (Women) बनण्याचा निर्णय घेतला होता. जहाद या जन्माने स्त्रीने पुरुष बनण्याचा निर्णय घेतला होता. लिंग पुनर्नियुक्तीची शस्त्रक्रिया झाली. रिपोर्ट्सनुसार, जहादला पुरुष बनवण्यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशय आणि काही खास अवयव काढण्यात आले नाहीत. या कारणास्तव जऱ्हाडला गर्भधारणा झाली आणि शेवटी त्यांनी मुलाला जन्म दिला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT