Pilot Dainik Gomantak
देश

Transgender ही होणार भारतात पायलट, DGCAने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

भारताचा पहिला ट्रान्सजेंडर पायलट, 23 वर्षीय अॅडम हॅरीच्या प्रयत्नांमुळे DGCAने आपले धोरण बदलले आहे.

दैनिक गोमन्तक

भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) प्रथमच ट्रान्सजेंडर पायलटना विमान उडवण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात बुधवारी वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, ज्यामुळे देशात ट्रान्सजेंडर्सना विमान उड्डाण करता येणार आहे.

DGCA ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, "ज्या ट्रान्सजेंडर उमेदवारांनी त्यांची हार्मोन थेरपी पूर्ण केली आहे किंवा ज्यांनी 5 वर्षांपूर्वी थेरपी सुरू केली आहे त्यांना विमान उड्डाण करता येईल. ट्रान्सजेंडर उमेदवारांची मानसिक आरोग्य चाचणी वर्ल्ड प्रोफेशनल असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर हेल्थने निर्धारित केलेल्या ब्लू प्रिंटवर आधारित असेल. जे ट्रान्सजेंडर अर्जदार हार्मोन थेरपी घेत आहेत किंवा गेल्या 5 वर्षांत शस्त्रक्रिया करून घेत आहेत त्यांची मानसिक आरोग्य स्थिती तपासली जाईल."

मार्गदर्शक तत्त्वानुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांना केवळ मानसिक मूल्यांकन करावे लागणार नाही, तर कोणत्याही शस्त्रक्रियेबाबत त्यांच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट तसेच सर्जनकडून प्रमाणपत्र सादर करावे लागेल, जे मागील एका वर्षात केलेल्या चाचण्यांवर आधारित असावे. जर उमेदवाराने या सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या तरच तो/ती तंदुरुस्त असल्याचे घोषित केले जाईल आणि कॉकपिटमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. याशिवाय, आयुष्यभर हार्मोन थेरपीवर असलेल्यांना केवळ तेव्हाच दाखल केले जाईल जेव्हा ते सिद्ध करू शकतील ज्यांची पुर्ण थेरपी झाली असले.

सर्व परवान्यांसाठी समान मार्गदर्शक तत्त्वे

DGCA नुसार, खाजगी पायलटचा परवाना, विद्यार्थी पायलटचा परवाना आणि व्यावसायिक पायलटचा परवाना, वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे पायलट परवान्यांच्या सर्व श्रेणींसाठी लागू आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्तींना फक्त प्रथम अधिकारी म्हणून उड्डाण करण्याची परवानगी आहे. जर ट्रान्सजेंडर पायलट पायलट-इन-कमांड असेल, तर त्यांच्या सह-वैमानिकाला त्या मशीनवर 250 तासांचा अनुभव असावा. भारताचा पहिला ट्रान्सजेंडर पायलट, 23 वर्षीय अॅडम हॅरी याला डीजीसीएने याआधी उड्डाणासाठी अपात्र ठरवले होते. अॅडम यांच्या प्रयत्नांमुळे डीजीसीएने आपले धोरण बदलले आहे.

अॅडमने दक्षिण आफ्रिकेतून परवाना घेतला आहे

अॅडम हॅरीने दक्षिण आफ्रिकेतून खाजगी पायलट परवाना (PPL) मिळवला आहे. नंतर त्याने जानेवारी 2020 मध्ये व्यावसायिक पायलट परवान्यासाठी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील राजीव गांधी अकादमी फॉर एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये स्वतःची नोंदणी केली. अॅडमने वैद्यकीय चाचणीही दिली होती, पण डीजीसीएने अनफिट म्हणून परवाना दिला नाही. मात्र आता DGCAने आपले काही नियम बदलून ट्रान्सजेंडरला विमान उडवण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

SCROLL FOR NEXT