Faridabad Goa Crime News Dainik Gomantak
देश

महागड्या बाटलीत स्वस्त दारू; फरिदाबादच्या सर्वात मोठ्या मद्यविक्रेत्याला गोव्यात अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गुरुवारी रात्री गोव्यात अटक केली.

Pramod Yadav

Faridabad Goa Crime News: फरिदाबादच्या सर्वात मोठ्या मद्यविक्रेत्याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आज आरोपींना गोवा न्यायालयात हजर करणार असून त्यांचा ट्रान्झिट रिमांड मागणार आहेत.

महागड्या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये स्वस्त दारू भरून विकल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मद्यविक्रेत्याला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गुरुवारी रात्री गोव्यात अटक केली.

सरदार मनिंदर सिंग (फरीदाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्या मद्यविक्रेत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात एनआयटी 2 मधून महागड्या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये स्वस्त दारू विकल्याप्रकरणी 2 जणांना अटक केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरातील आठ ठेक्यांवर दारू विक्री केल्याचे माहिती दिली. पोलिसांनी संबधित ठेक्यांवर छापा टाकत दारू जप्त केला. दरम्यान, तपासात हे सर्व कंत्राट सरदार मनिंदर सिंग यांचे असल्याचे महत्वाची माहिती पोलिसांनी मिळाली.

फरीदाबाद पोलिसांनी कारवाईचा धडका लावत महागड्या ब्रँडच्या बाटल्या पुरवणाऱ्या दिल्लीतील एका भंगार व्यापाऱ्यालाही अटक केली. तसेच, महागड्या ब्रँडच्या बाटल्यांची झाकणं विकणाऱ्या मुंबईतील एकाला देखील गुन्हे शाखेने अटक केली.

दरम्यान, सरदार मनिंदर सिंग यांचे नाव पुढे आल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक गोव्याला रवाना झाले. पथकाने गुरुवारी रात्री मनिंदर सिंग गोव्यातून अटक केली.

मनिंदर सिंग यांच्यावर यापूर्वीही अनेक आरोप करण्यात आले असून, त्याच्यावर दिल्लीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: आरक्षणावरून 'एसटी' आक्रमक, दोन दिवसांत पुढील भूमिका ठरणार; चळवळीचे नेतृत्व पुन्हा प्रकाश वेळीप यांच्याकडे

Karnataka Tourist Death Case: मी झोपेच्या गोळ्या संदीपला दिल्या हे खरं, पण..., अक्षताची पोलिसांसमोर स्पष्ट कबुली, खुनाचा गुन्हा नोंद

VIDEO: 'आता सर्व काही संपलं...' ब्राझीलच्या पराभवानंतर नेमार रडला; 80 गोलांसह आंतरराष्ट्रीय फुटबॉलला भावनिक निरोप!

Horoscope: सोमवार ठरणार खास! भगवान शंकराच्या कृपेने 'या' राशींचे चमकणार नशीब; धनलाभ, पदोन्नती आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याचे संकेत

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT