Tomato Kand Dainik Gomantak
देश

Tomato Kand: टोमॅटोमुळे घटस्फोटाची नौबत! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नीने सोडले घर, अखेर पतीने शपथ घेतली अन्...

Tomato Price Hike: टोमॅटोच्या सततच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामान्यांनाच बसत नाही तर त्याचा थेट परिणाम लोकांच्या कौटुंबिक जीवनावरही होत आहे.

Manish Jadhav

Tomato Price Hike: टोमॅटोच्या सततच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामान्यांनाच बसत नाही तर त्याचा थेट परिणाम लोकांच्या कौटुंबिक जीवनावरही होत आहे. मध्य प्रदेशातील शाहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेमाहोरी गावात याचीच प्रचिती आली आहे.

भाजीत टोमॅटो टाकल्यावर बायको चिडली

दरम्यान, बेमाहोरी गावात राहणाऱ्या संजीवकुमार वर्मा यांच्या कौटुंबिक जीवनावर टोमॅटोचा थेट परिणाम झाला आहे. संजीव यांनी भाजीत महागडे टोमॅटो (Tomato) टाकले. या गोष्टीवर त्‍यांची बायको इतकी चिडली की ती रागावून तडक घर सोडून निघून गेली.

नवऱ्याने 'ही' शपथ घेतली

दुसरीकडे, पत्नी गेल्यानंतर पतीने टोमॅटोचा कधीचं वापर करणार नसल्याची शपथ घेतली, प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. टोमॅटोमुळे रागावून घरातून निघून गेलेल्या पत्नीच्या शोधात पोलिसांची मदत मिळावी, अशी तक्रार संजीवने धानपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

संजीव ढाबा चालवतात

संजीव वर्मा एक छोटा ढाबा चालवतात, तसेच टिफिनचेही काम करतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्नीला न विचारता भाजीत टोमॅटो टाकले, हा प्रकार त्यांच्या पत्नीला समजताच ती संतप्त झाली आणि तिने आपल्या लहान मुलीसह (Girl) पतीचे घर सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT