Tomato Price Relief  Dainik Gomantak
देश

Tomato Price Relief: टोमॅटो झाला आणखी स्वस्त! रविवारपासून 40 रुपये किलो दराने उपलब्ध होणार

नाफेड, NCCF यांना केंद्र सरकारकडून सूचना

Akshay Nirmale

Tomato Price Relief News: महागड्या टोमॅटोच्या दरात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने रविवार 20 ऑगस्ट 2023 पासून टोमॅटो 40 रुपये किलो दराने विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहक विभागाने एनसीसीएफ आणि नाफेडला टोमॅटो ४० रुपये किलोने विकण्यास सांगितले आहे.

टोमॅटोच्या पुरवठ्यात सुधारणा झाल्यानंतर, घाऊक आणि किरकोळ बाजारात किंमती घसरल्यानंतर, अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एनसीसीएफ आणि नाफेडला टोमॅटो 40 रुपये किलोने विकण्यास सांगितले आहे.

यापूर्वी 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारने टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अवघ्या पाच दिवसांत सरकारी यंत्रणांकडून विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात किलोमागे दहा रुपयांची घट झाली आहे.

मंत्रालयाने सांगितले की, 14 जुलै 2023 पासून किरकोळ बाजारात स्वस्त दरात टोमॅटोची विक्री दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू करण्यात आली जेणेकरून सर्वसामान्यांना महागड्या टोमॅटोपासून दिलासा मिळू शकेल. नाफेड आणि एनसीसीएफने 14 जुलैपासून किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे.

दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत.

वास्तविक, अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव 250 रुपयांवरून 300 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेडने 90 रुपये किलोने टोमॅटोची विक्री सुरू केली.

16 जुलै 2023 पासून, किमती 80 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आल्या. 20 जुलैपासून 70 रुपये प्रति किलो, स्वातंत्र्यदिनापासून 50 रुपये प्रति किलो आणि आता 40 रुपये प्रति किलो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NCCF ने दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा येथे मोबाईल व्हॅन बसवून सर्वसामान्यांना स्वस्त दरात टोमॅटो विकले आहेत. NCCF ONDC मार्फत ऑनलाइन स्वस्त दरात टोमॅटो विकत आहे.

ग्राहक व्यवहार विभाग, NCCF आणि Nafed ने हे टोमॅटो आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून विकत घेतले आहेत आणि ज्या ठिकाणी त्याची किंमत खूप जास्त आहे अशा ठिकाणी विकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

SCROLL FOR NEXT