Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

Assembly Election 2023: निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आघाडीला ममतांनी दिला दणका, 'या' राज्यात स्वतंत्र लढणार

Tripura Assembly Election 2023: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आघाडीला दणका दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Tripura Assembly Election 2023: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आघाडीला दणका दिला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) त्रिपुरा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी आणि काँग्रेस यांच्या युतीत सामील न होण्याची घोषणा केली आहे. टीएमसी नेत्याने याबाबत माहिती दिली.

तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरा युनिटचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि रोड शो करण्यासाठी 6 फेब्रुवारीला त्रिपुरामध्ये पोहोचतील.

बिस्वास पुढे म्हणाले की, "तृणमूल काँग्रेस त्रिपुरातील (Tripura) आगामी विधानसभा निवडणुकीत सीपीआय(एम)-काँग्रेस आघाडीसोबत कोणतीही युती करणार नाही. कम्युनिस्ट पक्ष शासित त्रिपुरामध्ये अडचणीचा सामना करणारे अनेक काँग्रेसजन आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याच पक्षाला मतदान करणार नाहीत.''

बिस्वास पुढे असेही म्हणाले की, 'सीपीआय(एम)-काँग्रेस युतीचे 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जे झाले तेच त्रिपुरामध्येही होईल. त्यामुळेच टीएमसी या आघाडीपासून अंतर ठेवणार आहे. त्रिपुरात टीएमसी फक्त अशाच जागा लढवणार आहे, जिथे यश मिळण्याची शक्यता आहे.' त्याचबरोबर युतीसाठी इतर पक्षांचे दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिस्वास म्हणाले की, "ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) 6 फेब्रुवारीला प्रचारासाठी त्रिपुराला पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी एका रोड शोमध्ये सहभागी होतील." ममता यांच्याशिवाय पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी 2 फेब्रुवारीला प्रचारासाठी येथे पोहोचतील.

अभिषेक बॅनर्जी त्रिपुराच्या धर्मनगर आणि सिपाहिजाला जिल्ह्यात दोन निवडणूक रॅली घेणार आहेत. तसेच, पक्षाचे इतर अनेक दिग्गज नेते देखील त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोलकाताहून येथे येतील. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT