Naren Chakraborty Dainik Gomantak
देश

"भाजप समर्थकांना धमकावा...": टीएमसी आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

पश्चिम बंगालमधील (West Bengal) राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमधील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. भाजप आणि तृणमुल कॉंग्रेसचे नेते एकमेकांवरील शाब्दीक हल्ल्यापासून शारिरीक हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. याच पाश्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका व्हिडिओवरुन भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये आसनसोल लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी जाणाऱ्या भाजप (BJP) समर्थकांना धमकावण्यास टीएमसी आमदार पक्ष कार्यकर्त्यांना सांगत आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या बैठकीत पांडबेश्वरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेन चक्रवर्ती पक्ष कार्यकर्त्यांना सांगत आहेत की, 'त्यांना सांगा, तुम्ही मतदान केल्यानंतर कुठे जाणार, ते तुमच्या जबाबदारीवर आहे.' हा व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि इतर नेत्यांनी शेअर केला आहे. (TMC MLAs are urging party workers to intimidate BJP supporters)

दरम्यान, पांडबेश्वर विधानसभा जागा आसनसोल लोकसभा जागेचा एक भाग आहे, जिथे पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. व्हिडिओमध्ये चक्रवर्ती यांना बंगालीमध्ये असे म्हणताना दिसत आहेत की, "जे भाजपचे कट्टर समर्थक आहेत आणि ज्यांना प्रभावित करता येत नाही, त्यांना धमकावले जाऊ शकते." त्यांना सांगा, 'तुम्ही मतदान करायला गेलात, तर तुम्ही भाजपला मतदान कराल, असे आम्ही मानू. मतदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर राहा. तुम्ही मतदानाला गेला नाही तर तुम्ही आम्हाला पाठिंबा देत आहात असे आम्ही मानू. तुम्ही बरे आहात, नोकरी-व्यवसायासाठी जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.'' तर दुसरीकडे, व्हिडिओ ट्विट करत मालवीय यांनी म्हटले की, ''हे गुन्हेगार तुरुंगातील धडे गिरवायला लागले आहेत, परंतु ममता बॅनर्जी त्यांना संरक्षण देतायेत. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे.''

तसेच, सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'चक्रवर्ती हे यापूर्वी बर्दवान जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसच्या पांडबेश्वर ब्लॉक युनिटचे अध्यक्ष होते.' ते पुढे म्हणाले की, 'त्यांना 2016 मध्ये कोलकाता विमानतळावर विनापरवाना बंदूक आणि काडतुसे घेऊन उड्डाण करण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले होते.'

दुसरीकडे मात्र, याप्रकरणी तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रिया (Babul Supriyo) यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोलची जागा रिक्त झाली आहे. बाबुल यांनी भाजपचा राजीनामा देऊन टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीने बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर दुसरीकडे, शत्रुघ्न टीएमसी भाजपमधून काँग्रेसमध्ये पोहोचले आहेत. या जागेवरुन भाजपने अग्निमित्र पॉल यांना उमेदवारी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT