नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भारतीय जनता पक्षाने ( BJP ) दणदणीत विजय मिळवला आहे . त्यामुळे यूपी, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. पक्षाच्या या कामगिरीनंतर भाजपला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करता येईल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र , राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा यावर अजिबात विश्वास नाही. पाचपैकी चार राज्यांत भाजपने विधानसभा निवडणुका जिंकणे म्हणजे एखाद्या स्पर्धेत लीग मॅच जिंकणे आहे, असे वर्णन त्यांनी केले.
'पाच राज्याच्या निवडणुकीचे निकाल भविष्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ठरवू शकत नाहीत,' या आपल्या ठाम भूमिकेचा त्यांनी एका माध्यमाशी खास संवाद साधताना पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीचा निकाल विधानसभा निवडणुका ठरवू शकत नाहीत आणि हे पंतप्रधान मोदींना (PM modi) इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे माहिती आहे. जर आपण उत्तर प्रदेशचे उदाहरण घेतले आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर काय झाले ते समजेल. त्यानंतर यूपीमध्ये समाजवादी पक्षाचा विजय झाला आणि भाजप चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.'
'पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 2017 आणि 2019 मध्ये काय घडले याचा उल्लेख केला होता. 2002 नंतरचा संदर्भ नेहमी घेता येईल आणि यूपीने विधानसभेत जसे मतदान केले तसे लोकसभेत कधीही घडले नव्हते. तेव्हा 2014 चा निकाल डोळ्यासमोर ठेवला तर ही निवडणूक भाजपने एखाद्या लीग मॅचमध्ये जिंकल्यासारखी आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला विजयाच्या रूपाने मिळालेल्या गतीचा संदर्भ देत प्रशांत किशोर यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.