TMC is 'Temple-Mosque-Church' says Mamata Banerjee

 

Dainik Gomantak

देश

मोदी वाराणसीत, तर ममता म्हणतायत होय TMC म्हणजे 'मंदिर, मशीद आणि चर्च'

तृणमूलने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांना आपल्या पक्षात घेतल्यापासून राज्यात आक्रमक मोहीम सुरू केली आहे

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक राज्याला पाठिंबा देतो. गोव्यातील भाजपच्या (Goa BJP) राजवटीला आपला पक्ष हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गोव्यातील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता म्हणाल्या की TMC म्हणजे "मंदिर, मशीद आणि चर्च".तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर असतानाच ममता बॅनर्जींचं हे विधान आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीआहे. (TMC is 'Temple-Mosque-Church' says Mamata Banerjee)

गोव्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी म्हणाल्या , "आम्ही येथे मतविभागणीसाठी नाही तर मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि टीएमसी आघाडीला विजयी करण्यासाठी आलो आहोत. हा भाजपला पर्याय आहे. जर कोणाला पाठिंबा द्यायचा असेल तर तो त्यांचा निर्णय आहे . आम्ही आधीच ठरवले आहे. आम्ही लढू आणि मरू पण मागे हटणार नाही."

गोवा हे हिंदूबहुल राज्‍य आहे, त्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्‍चन आहेत – जे पोर्तुगीज भूतकाळाचा वारसा पुढे चालवतात. राज्यात मुस्लिमांची संख्याही चांगली आहे. राज्यात प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता आहे, पण आता जवळपास दशकभरापासून भाजपची सत्ता आहे.तृणमूल - जो 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाया वाढवत आहे -तर दुसरीकडे आधीच काँग्रेस अडचणीत आहे. बॅनर्जी यांनी निदर्शनास आणून दिले की, सर्वात मोठा पक्ष असूनही गेल्या निवडणुकीत काँग्रेसने व्यावहारिकरित्या भाजपला वॉकओव्हर दिला.

गोव्यात बॅनर्जी यांनी सुधीन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबतही युती केली आहे, ज्याने 2017 मध्ये भाजपला राज्यात सत्तेवर येण्यास मदत केली आणि अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे.तृणमूलने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांना आपल्या पक्षात घेतल्यापासून राज्यात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. याशिवाय माजी टेनिसपटू लिएंडर पेसही टीएमसीमध्ये सामील झाला आहे. ते राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT