Tirupati Temple Property Dainik Goamantak
देश

Tirupati Temple Property: 2.3 लाख कोटींची मालमत्ता, अनेक टन सोने, दागिने; तिरूपतीची संपत्ती पाहून तुमचे डोळे चक्रावतील

ट्रस्ट स्थापनेनंतर प्रथमच संस्थेने संपत्ती जाहीर केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tirupati Temple Property: दक्षिण भारतातील तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. या मंदिराची एकूण संपत्ती 2.3 लाख कोटी रुपये इतकी आहे. तिरुपतीच्या तिरुमला तिरुपती देवस्थानने 1933 मध्ये ट्रस्ट स्थापनेनंतर प्रथमच त्याची संपत्ती (Tirupati Temple Property) जाहीर केली आहे.

मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टकडे सध्याच्या दरानुसार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 10.3 टन सोन्याच्या ठेवी आहेत. त्यात 2.5 टन सोन्याचे दागिने आहेत, त्यापैकी बहुतेक पुरातन वस्तू आहेत. तसेच, बँकांमध्ये मंदिराच्या सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मंदिराचे उत्पन्न व्यवसाय आणि संस्थांच्या देणगीतून येते. तिरुपती मंदिराच्या देशभरात 7,123 एकरमध्ये पसरलेल्या 960 मालमत्तांचा समावेश आहे.

देशभरात 960 मालमत्ता: तिरुपतीच्या भगवान वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), जगातील सर्वात मोठी हिंदू एंडॉवमेंट आहे. संस्थेने जाहीर केलेल्या संपत्तीनुसार संस्थेच्या भारतात 960 मालमत्ता असून, त्याचे अधिकृत मूल्य 85,705 कोटी रुपये आहे.

एप्रिलपासून मंदिराला मिळालेल्या एकूण देणगीचा आकडा 700 कोटींच्या पुढे गेला असून, देणगी अजून वाढत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानने देशाच्या विविध भागांत मंदिरांचे बांधकाम सुरू केले आहे. एवढेच नव्हे परदेशात देखील अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये काम सुरू आहे. मंदिराच्या 14,000 कोटींची एफडीही असल्याचे सांगितले जाते. लोकांनी दिलेले दान मंदिराच्या आवारात ठेवलेल्या दानपेटीत ठेवले जाते.

देणगी मिळवण्याच्या बाबतीत हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर आहे. मंदिराचे छत असो की भिंती किंवा दरवाजे सर्व सोन्याने मढवलेल्या आहेत. दररोज 80 हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात देणगी देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT