Tilak Verma, Sunil Gavskar Dainik Gomantak
देश

Tilak Verma: 'तो भारताचा कर्णधार होणार...' सुनील गावस्करांनी तिलक वर्माबाबत केली मोठी भविष्यवाणी Watch Video

tilak verma future captain: आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीबद्दल तिलक वर्मा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Sameer Amunekar

sunil gavaskar prediction on tilak verma

आशिया कप २०२५ च्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि या ऐतिहासिक यशात तिलक वर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. केवळ २२ वर्षीय असलेल्या तिलकने कठीण परिस्थितीत संयमित पण आक्रमक खेळ करत भारताच्या विजयाला आकार दिला. त्याने ५३ चेंडूत ६९ धावा झळकावत सामनावीराचा मान पटकावला.

कठीण परिस्थितीत धडाकेबाज खेळी

भारताला १४७ धावांचे माफक लक्ष्य गाठायचे होते, मात्र सुरुवातीला सलग विकेट गमावल्यानंतर संघाची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती. दडपणाच्या प्रसंगी तिलकने शिवम दुबेसोबत खंबीर भागीदारी केली. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने भारतीय डावाला स्थिरता दिली आणि शेवटपर्यंत लढत राहून विजय निश्चित केला.

कर्णधार बनणार...

सामन्यानंतर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील विशेष कार्यक्रमात माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी तिलक वर्माचे कौतुक केले. गावस्कर म्हणाले, "तिलकच्या प्रतिभेबद्दल शंका नाही. लाल चेंडू असो वा पांढरा, तो सर्व फॉर्मेटमध्ये मोठ्या धावा करू शकतो. त्याचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन, शांत स्वभाव आणि सकारात्मक वृत्ती त्याला वेगळं बनवतात.

अंतिम सामन्यात त्याने ज्या प्रकारे भागीदारी केली आणि शॉट्स खेळले, ते त्याच्या मोठेपणाचं उदाहरण आहे. तो भविष्यात भारताचा कर्णधारही ठरू शकतो." असं गावस्कर म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taj Story Controversy: ताजमहालमध्ये शिवमंदिर? परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’वरुन वादाची ठिणगी, पोस्ट करत म्हणाले...

Viral Video: जीवघेणा स्टंट व्हायरल..! एकाच स्कूटीवर 5 तरुण, पाचव्याला पठ्ठ्यांनी बसवलं खांद्यावर; व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Tilak Varma: "पाकिस्तान आमच्यासमोर टिकू शकत नाही..." आशिया कप फायनलचा हिरो तिलक वर्माची पाकिस्तानवर थेट टीका

Viral Post: रिटायरमेंटनंतर गोव्यात आलेला NRI लगेच परतला; म्हणाला,"दारूशिवाय इथे कुठलीच संस्कृती नाही!"

Amit Shah In Goa: गृहमंत्री अमित शहा शनिवारी गोव्यात; 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ

SCROLL FOR NEXT