Jagannath Temple Dainik Gomantak
देश

Jagannath Temple: जगन्नाथाच्या अंतर्गत खजिन्यात 3 रहस्यमय पेट्या; दुर्मिळ दागिने असण्याची शक्यता, 48 वर्षांनंतर रत्न भांडाराची मोजणी

Jagannath Temple Ratna Bhandar Treasure: पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या भीतर रत्न भांडारात’ (अंतर्गत खजिना) यापूर्वीच्या नोंदींमध्ये उल्लेख नसलेल्या तीन पेट्या आढळल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

भुवनेश्‍वर: पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या भीतर रत्न भांडारात’ (अंतर्गत खजिना) यापूर्वीच्या नोंदींमध्ये उल्लेख नसलेल्या तीन पेट्या आढळल्या आहेत. या पेट्यांमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या जुन्या धार्मिक परंपरांशी संबंधित दुर्मिळ अलंकार असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या तपासाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तब्बल ४८ वर्षांनंतर सुरू झालेल्या या वस्तूंच्या मोजणीला आतापर्यंत १०० तासांहून अधिक वेळ लागला आहे. कार्तिक महिन्यातील महत्त्वाच्या धार्मिक विधींमुळे ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी झालेल्या सत्रांनंतर ही मोजणी थांबविण्यात आली होती.

एका अलंकारासाठी एक तास

तब्बल ४८ वर्षांनंतर यंदा मार्चमध्ये खजिन्याच्या मोजणीला सुरुवात झाली. ‘चलंती भांडार’ (नियमित वापरातील कक्ष) आणि ‘बाह्य भांडार’ (बाहेरील कक्ष) यांमधील वस्तूंची मोजणी पूर्ण झाली आहे. सध्या ‘भीतर भांडार’ (अंतर्गत कक्ष) मधील मौल्यवान वस्तूंची मोजणी आणि वजन करण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रत्येक अलंकाराची तपासणी करण्यासाठी किमान एक तास लागतो. त्यामध्ये जडवलेल्या मौल्यवान रत्नांची ओळख पटविणे, त्यांची स्थिती नोंदविणे आणि जुन्या नोंदींशी त्यांचा ताळमेळ घालणे, अशी कामे केली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: खेळायला जातो सांगून गेला, पण परतलाच नाही! 14 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

रॉय नाईक-एकनाथ शिंदे भेटीने फोंड्यात राजकीय खळबळ; महादेव नाईकही उपस्थित

World Junior Chess Champion: वय अवघे 15 वर्षे; गोव्याच्या एथन वाझने जिंकले ज्युनियर बुद्धिबळाचे जगज्जेतेपद!

फिनिशर आता बनणार थेट कर्णधार! IPL 2027 मध्ये रिंकू सिंहच्या हाती KKR ची कमान? दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

IND vs NZ: आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! सामन्यादरम्यान टीम इंडियात मोठा बदल; कारण काय?

SCROLL FOR NEXT