Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; तिघांच्या हत्येनंतर जमावाने जाळली घरे

Manipur Violence: बॅरिकेडेड क्षेत्र ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रायफल्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) यांनी रोखले, ज्यामुळे त्यांनी दगडफेक केली.

Ashutosh Masgaunde

Three Killed in Fresh Violence In Manipur: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. हिंसाचाराच्या ताज्या घटनेमध्ये, शुक्रवारी रात्री उशिरा बिष्णुपूर जिल्ह्यात तीन जण ठार झाले.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले तिघेही हे क्वाक्ता भागातील मेईतेई समुदायाचे होते. यानंतर संतप्त जमावाने कुकी समुदायाची अनेक घरे जाळली.

यापूर्वी बिष्णुपूर जिल्ह्यात गुरुवारी सशस्त्र दल आणि मेईतेई समुदायातील आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत 17 लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर, इम्फाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम मध्ये पुन्हा एकदा कर्फ्यू लागू केला आहे.

सशस्त्र दल आणि मणिपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कांगवाई आणि फुगाकचाओ भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मेईतेई (Meitei) समुदायातील महिला जिल्ह्यातील बॅरिकेडेड क्षेत्र ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. त्यांना आसाम रायफल्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) यांनी रोखले, ज्यामुळे त्यांनी दगडफेक केली.

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय संघर्ष आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी 21 ऑगस्ट रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची शिफारस केली आहे.

मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीमुळे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे. व्हायरल व्हिडिओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलावे याची मागणी करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

विरोधी पक्षांची आघाडी INDIA च्या शिष्टमंडळाने अलीकडेच मणिपूरला भेट दिली, त्या दरम्यान त्यांनी मदत शिबिरांमध्ये विस्थापित स्थानिकांची आणि राज्यपाल उईके यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाने राज्यपालांना दोन दिवसीय भेटीदरम्यान आलेल्या राज्यातील माहिती दिली आणि मणिपूरमधील परिस्थितीबाबत निवेदनही सादर केले.

त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली होती.

प्रतिनिधींनी राष्ट्रपती मुर्मू यांना मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हितासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT