UP Doctor Rapes Teacher: उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका महिला शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला शिक्षिकेने तीन डॉक्टरांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मैत्रीच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.
आरोपी डॉक्टरला अटक
महिलेवर (Woman) बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी डॉक्टरांना (Doctors) अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बस्ती सदर कोतवाली भागातील एका हॉस्पिटलमध्ये तैनात असलेल्या डॉक्टरने सोशल मीडियावर माझ्याशी मैत्री केली आणि मला भेटायला बोलावले, अशी तक्रार महिलेने पोलिसात केली आहे. दुसरीकडे, मंडल अधिकारी (सीओ) शहर आलोक प्रसाद यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरुन बस्ती येथील काली हॉस्पिटलच्या तीन आरोपी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाळ्यात अडकवले
पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, 'काली हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. सिद्धार्थने माझ्याशी एका सोशल मीडिया (Social Media) वेबसाइटवर मैत्री केली. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी मला भेटण्यासाठी तो बस्तीला आला.' काली हॉस्पिटलच्या वसतिगृहातील एका खोलीत डॉक्टरने नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.