Brahmos  Dainik Gomantak
देश

पाकिस्तानवर चुकून Missile डागल्याबद्दल भारतीय वायुसेनेच्या 3 अधिकाऱ्यांची हकालपट्टी

Pakistan: पाकिस्तानवर चुकून डागलेल्या क्षेपणास्त्रांसाठी तीन भारतीय वायुसेना अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानवर चुकून डागलेल्या क्षेपणास्त्रासाठी तीन भारतीय वायुसेना अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले होते. 9 मार्च 2022 रोजी एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानवर डागण्यात आले. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. IAF ने आपल्या निवेदनात यासंबंधीची माहिती दिली आहे. एअर व्हाईस मार्शलवर एअर मुख्यालयातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अपघाती गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. सविस्तर तपास केल्यानंतर या घटनेसाठी तिघांना जबाबदार धरण्यात आले.

दरम्यान, 9 मार्च रोजी चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते. पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 मार्च रोजी संसदेत सविस्तर उत्तर दिले. ते म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्राचं अपघाती प्रक्षेपण झाल्याच्या घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. "दुर्दैवाने 9 मार्च रोजी एक क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले. ही घटना नियमित तपासणीदरम्यान घडली. आम्हाला नंतर कळले की, ते पाकिस्तानात पडले होते," असे त्यांनी राज्यसभेत सांगितले होते.

त्याच वेळी, पाकिस्तानने म्हटले होते की, 'क्षेपणास्त्र आपल्या हवाई हद्दीत 40,000 फूट उंचीवर आणि आवाजाच्या तिप्पट वेगाने 100 किमी अंतरावर गेले. क्षेपणास्त्रावर कोणतेही वारहेड नव्हते, त्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियाँ चन्नू शहरात पडले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, भारताने लगेचच या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT