Uttar Pradesh Dainik Gomantak
देश

30 मुलींचा जीव धोक्यात घालून, शिक्षकांनी बदली रोखण्यासाठी केला थरारक प्रयत्न

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेहजाम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सुमारे बारा-तेरा विद्यार्थिनींना गुरुवारी रात्री त्यांच्या दोन शिक्षकांनी टेरेसवरती कोंडून ठेवले होते.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेहजाम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या (KGBV) सुमारे बारा-तेरा विद्यार्थिनींना गुरुवारी रात्री त्यांच्या दोन शिक्षकांनी टेरेसवरती कोंडून ठेवले होते. अशी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. लखीमपूर खेरी मूलभूत शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले आहे की, शिक्षकांनी शिस्तभंगाच्या कारणास्तव दुसऱ्या KGBV मध्ये बदल्या रद्द करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी अशा युक्त्या वापरल्या आहेत. (Threatening the lives of 30 girls the teachers made a thrilling attempt to prevent the transfer)

वॉर्डन ललित कुमारी यांनी त्यांना आणि जिल्हा समन्वयक, कन्या शिक्षण रेणू श्रीवास्तव यांना घटनेची माहिती दिली आहे, त्यानंतर ते शाळेत पोहोचले आणि बरेच तास तिथेच राहिले, असे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातून महिला पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि मुलींना त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत परत सुखरुप आणण्यात आले.

या संदर्भात, जिल्हा समन्वयक बालिका शिक्षण रेणू श्रीवास्तव यांनी मनोरमा मिश्रा आणि गोल्डी कटियार या दोन शिक्षकांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला, असे पांडे यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची चार सदस्यीय समितीमार्फत विभागीय चौकशी केली जाणार आहे, तर समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तपासात दोषी आढळल्यास सेवा करार रद्द करण्यासह शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फिटनेस आणि टायमिंगचं परफेक्ट उदाहरण! खेळाडूनं गरुडासारखी झेप घेत पकडला भन्नाट कॅच, व्हिडिओ एकदा बघाच

Sattari Ganja: सत्तरीत गांजा पोचला कसा? 'तो' ड्रग्स पॅडलर कोण? Special Report Video

Operation Sindoor: पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार होता? शाहबाज शरीफ यांनी स्पष्टच सांगितलं

John Cena: 'You Can't See Me' आता शेवटचं? जॉन सीनाचं WWE मधील फेअरवेल मॅच लीक, 'या' वर्ल्ड चॅम्पियनविरुद्ध होणार सामना

Chemical Free Fruits Goa: गोव्यात मिळणार रसायनमुक्त फळे! कृषी विभागाने दिली खुशखबर; Watch Video

SCROLL FOR NEXT