कोरोना विषाणुच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतून (Second Wave) देश सावरतो न सावरतो तोच आता तिसऱ्या लाटेचे (Third Wave of Covid-19) संकट देखील येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. कारण, देशात लवकरच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे आगमन होईल असे तज्ञांनी सांगितले आहे. भारतात ऑगस्टच्या मध्यापासून कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ दिसेल आणि तिसरी लाटेला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविण्यात आलेल्या या अहवालात दावा करण्यात आला आहे की, याकाळात सकारात्मक येणाऱ्यांची संख्या दररोज वाढेल.
तिसऱ्या लाटेत दररोज 100,000 ते 150,000 संसर्गाची प्रकरणे नोंदविली जाऊ शकते असा दावा हैदराबाद आणि कानपूर येथील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आले आहे. (Third wave of corona is expected in India by the end of August)
संशोधकांच्या या गटाने केलेल्या अभ्यासानुसार भारतात ऑगस्टमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांनी असेही म्हटले आहे की, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असू शकते.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे एपिडेमिओलॉजी आणि संसर्गजन्य रोग प्रमुख डॉ.समीरन पांडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोविड -१9 ची तिसरी लाट आली तर ती ऑगस्टच्या अखेरीस येईल.
सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोविड -19 ची 40,134 नवीन प्रकरणे आणि 422 मृत्यूंची नोंद झाली आहे तरसध्या एकूण प्रकरणांची संख्या 3,16,95,958 आहे. देशातील एकुणमृतांची संख्या 4,24,773 वर पोहोचली आहे.तर देशात सध्या कोविड -19 च्या सक्रिय प्रकरणांची संख्या 4,13,718 आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.