Crime  Dainik Gomantak
देश

कोर्टातच केली चोरी; लॅपटॉप, आयपॅड आणि तीन मोबाईल केले लंपास

पोलिस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कोर्टातच चोरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एक बॅग चोरली. बॅगेत लॅपटॉप, आयपॅड आणि तीन मोबाईल होते. या लॅपटॉप, आयपॅड आणि सेल फोनमध्ये कृषिमंत्री काकाणी गोवर्धन यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्याचे पुरावे होते. (Theft in court in Andhra Pradesh)

दोन आरोपींची चौकशी
याप्रकरणी 13 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. पोलिस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. चोरट्यांनी रिकामी बॅग न्यायालयाजवळ फेकून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच मुख्य आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल, असे ते म्हणाले.

2016 पासून खटला सुरू आहे
गोवर्धन रेड्डी यांनी यापूर्वी तत्कालीन टीडीपी मंत्री सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांच्यावर एक हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती निर्माण केल्याचा आरोप केला होता. यानंतर 2016 मध्ये सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांनी गोवर्धन रेड्डी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. हाच खटला न्यायालयात प्रलंबित होता, मात्र सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच 10 एप्रिल रोजी त्यांच्याविरोधातील पुरावे न्यायालयातून (Court) चोरीला गेले. चोरीला गेलेल्या बॅगमध्ये गोवर्धन रेड्डी यांच्या विरोधात पुरावे असल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT