The PM Memento e-auction will run from October 2 to 31, 2023. Dainik Gomantak
देश

पंतप्रधानांच्या भेटवस्तू खरेदीची संधी, अशी आहे लिलावात सहभागी होण्याची प्रोसेस

या ई-लिलावामध्ये आपला समृद्ध वारसा दाखवणाऱ्या कलाकृतींचा एक विलक्षण संग्रह आहे. ई-लिलाव 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत https://pmmementos.gov.in/ वर थेट असेल.

Ashutosh Masgaunde

The PM Memento e-auction will run from October 2 to 31, 2023:

पंतप्रधान मोदींना देश-विदेशातील विविध व्यक्ती आणि संस्थांकडून भेटवस्तू मिळत असतात. पंतप्रधान या भेटवस्तूंचा लिलाव करतात आणि त्यातून मिळालेली रक्कम समाजकारणासाठी दान करतात. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चौथ्यांदा त्यांच्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू केला होता. यामध्ये 100 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. हा लिलाव २ ऑक्टोबरपर्यंत होता.

पण आता तुम्हाला पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंना महिनाभर स्वतःचे बनवण्याची संधी मिळणार आहे. एका वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार, पीएम मेमेंटो ई-लिलाव 2 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल.

यावेळी, लिलावात सहभागी होऊन तुम्ही पंतप्रधानांना मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू स्वतःच्या बनवू शकता. या स्मरणिकांचं प्रदर्शनही तुम्ही पाहू शकता. हे प्रदर्शन नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, जयपूर हाऊस, नवी दिल्ली येथे आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 अशी आहे.

येथे नोंदणी करा

तुम्हाला पीएम मेमेंटो ई-लिलावात सहभागी व्हायचे असल्यास, तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. तुम्हाला pmmementos.gov.in वर जाऊन ही नोंदणी करावी लागेल.

यानंतर तुम्ही लिलावात सहभागी होऊ शकता. या लिलावातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' प्रकल्पात वापरली जाणार आहे.

याआधीही झाला आहे लिलाव

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या लिलावाचे खास आकर्षण म्हणजे पंतप्रधानांना खेळाडूंकडून मिळालेल्या भेटवस्तू. या भेटवस्तू फक्त 5 लाख रुपयांपासून सुरू होतात. यातून 20 कोटींहून अधिक रक्कम जमा होणार असल्याचे मानले जात आहे.

याआधी 2019 मध्ये पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा दोनदा लिलाव झाला होता. यानंतर 2020 मध्येही त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा दोनदा लिलाव झाला. ही रक्कम स्वच्छता अभियानात वापरण्यात आली.

अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत सुमारे सात हजार लोकांनी चार आवृत्त्यांमध्ये भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. आतापर्यंत 33 कोटी रुपये ई-ऑक्शनमधून आले आहेत. पंतप्रधानांच्या, विविध देशाच्या दौऱ्यांदरम्यान या भेटवस्तू मिळाल्या होत्या.

यापूर्वी 2019, 2020, 2021 आणि 2022 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूचा लिलाव झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs: पेडणे न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; ज्येष्ठ नागरिकाचा घेतला चावा, न्यायालयात येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

Revolutionary Goans Party: 'आरजी' ये तेरा क्या हो गया?

SCROLL FOR NEXT