Gandhi Vs Godse: खेदजनक! गांधी जयंतीला एक्सवर नथुराम गोडसे ट्रेंडिंग, हजारो ट्विट्सचा भडीमार

शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांच्या विरोधात काहीजण विकृती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
Gandhi Jayanti 2023
Gandhi Jayanti 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Gandhi Vs Godse:: भारतासह जगभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत आहे. शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे गांधीचे विचार नेहमीच प्रेरित करत असतात. नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी गांधी यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली होती.

आज सर्वत्र गांधींजीची जयंती साजरी होत असताना, ट्विटर (आत्ताचे एक्स) वर नथुराम गोडसे ट्रेडिंग होत आहे.

एक्सवर अनेकांनी महात्मा गांधींच्या विरोधात भावना व्यक्त करत, नथुराम गोडसे अमर रहे हा हॅशटॅग वापरत विविध ट्विट्स केले आहेत. जगात गांधी जयंती साजरी होत असताना अशापद्धतीने ट्विट करणाऱ्या लोकांविरोधात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांच्या विरोधात काहीजण विकृती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Gandhi Jayanti 2023
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील 23 गाड्या रद्द, मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

काही जणांनी नथुराम गोडसे जिंदाबाद असाही हॅशटॅग वापरुन गोडसचे उदोउदो केला आहे.

गोडसे आणि गांधी हा वाद दरवर्षी गांधी जयंतीला पाहायला मिळतो. दरवर्षी दोघांची तुलना करुन मीम्स व्हायरल केल्या जातात. .यावर्षी देखील गांधी जयंतीला गोडसेच्या समर्थनात काही जणांनी ट्विट केले आहेत. ट्विटरवर आत्तापर्यंत 18 हजार ट्विट्स करण्यात आली आहेत. तर नथुराम गोडसे हॅशटॅग वापरुन 28 हजार ट्विट्स करण्यात आले आहेत.

गांधी जयंती हॅशटॅगने 70 हजार टविट्स केले आहेत. महात्मा गांधी हा टॅग वापरुन 98 हजार तर लाल बहादुर शास्त्री टॅग वापरुन 68 हजार ट्विट करण्यात आली आहेत.

याशिवाय फादर ऑफ नेशन आणि बापू हा टॅग वापरुन देखील ट्विट करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Priyanka Gandhi Attack PM Modi
Rahul Gandhi On CJP NEET Paper Leak Protest
Sonia Gandhi Education System
Delhi youth protest parliament march
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com