Vinayak Damodar Savarkar Dainik Gomantak
देश

भारत जोडो यात्रेच्या पोस्टरमध्ये सावरकरांचा फोटो, भाजप-Congress पुन्हा आमने-सामने

Vinayak Damodar Savarkar: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Vinayak Damodar Savarkar: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या चर्चेत आहे. राहुल गांधींच्या या यात्रेचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र, यावेळी या दौऱ्याशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. खरे तर काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या 14 व्या दिवशी मोठी चूक झाली आहे. यात्रेच्या एका पोस्टरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे पोस्टर एर्नाकुलममध्ये लावण्यात आले होते. जेव्हा हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर होऊ लागले तेव्हा काँग्रेसला (Congress) आपली चूक लक्षात आली आणि काही वेळातच या पोस्टरमध्ये सावरकरांचा फोटो महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) फोटोने झाकण्यात आला.

भाजप नेत्यांवर निशाणा साधला

मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी या पोस्टरद्वारे काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की, 'राहुल जी, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी इतिहास आणि सत्य समोर येते. सावरकर वीर होते! लपणारे "कायर" असतात.'

दुसरीकडे, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटले की, "एर्नाकुलम (Ernakulam) येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर सावरकरांचा फोटो लावण्यात आला. उशिरा का होईना, पण राहुल गांधींना (Rahul Gandhi) समजलं. जवाहरलाल नेहरुंनी त्यांना फक्त 2 आठवड्यात पंजाबमधील नाभा तुरुंगातून सोडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणाऱ्या दयेच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती.

यातच, अमित मालवीय यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत म्हटले की, 'अरे खोट्या बातम्या विकणाऱ्यांनो, स्वातंत्र्य लढ्यात नेहरुंनी सुमारे 10 वर्षे तुरुंगात घालवली होती, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत होता. सॉरी म्हणत होता.'

सावरकरांबद्दल काँग्रेस भाजपचे वेगळे मत

सावरकरांबाबत काँग्रेस आणि भाजपची वेगवेगळी मते आहेत. भाजप त्यांना महान स्वातंत्र्यसैनिक मानते, तर काँग्रेस स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. ब्रिटिशांची माफी मागणारी व्यक्ती स्वातंत्र्यसैनिक होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गेल्या काही काळापासून सावरकरांवरुन काँग्रेस आणि भाजप अनेकदा आमनेसामने आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT