BarailiTraffic Police Challan: उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक विचित्र प्रकरण समोर आलेले आहे. येथे वाहतूक पोलिसांनी दुसऱ्या शहरात असलेल्या कारला वाहतूक नियमांचा भंग केल्यावरून दंड केला आहे.
हे चलन फाडले गेले तेव्हा कारचा मालक गोव्यात होता आणि त्याची कार गुरूग्राममध्ये होती. त्यामुळे चलनचा मेसेज मोबाईलवर येताच कार मालक आश्चर्यचकित झाला.
विवेक मिश्रा असे या कारमालकाचे नाव आहे. आणि 14 मे रोजी ही घटना घडली होती. गेल्या काही दिवसांत बरेलीतील वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना चलन पाठवणे सुरू केले आहे. यातूनच गुरुग्राममध्ये असलेल्या कारला बरेलीमध्ये वाहतूक पोलिसांनी चलन जारी केले
या कारच्या मालकाने याबाबत एसएसपी आणि एसपी ट्रॅफिक यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
मिश्रा यांच्या कारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 54,000 रुपयांचा दंड ठोठावल्याचा मेसेज त्यांना आला. त्यावर मिश्रा चक्रावून गेले. कारण मिश्रा त्या दिवशी गोव्यात होते आणि त्यांची कार त्या दिवशी गुरुग्राममध्ये होती.
बरेलीतील अयुब खान क्रॉसिंगजवळ वाहतूक पोलिसांनी हे चलन फाडले आहे. एसएसपी आणि एसपी ट्रॅफिककडे तक्रार करण्यासोबतच या कारमालकाने मुख्यमंत्री पोर्टलवरही तक्रार केली आहे.
कोणीतरी मिश्रा यांच्या गाडीचा व्हिडिओ एडिट करून त्याचा व्हिडिओ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात एसपी ट्रॅफिक राम मोहन सिंग यांनी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन देताना पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.