Drug Case Dainik Gomantak
देश

Drugs Case: भारतात अमलीपदार्थ जप्तीचे प्रमाण वाढले

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : तस्करीचे प्रमाणसुद्धा वाढल्याबाबत चिंता व्यक्त

गोमन्तक डिजिटल टीम

Drugs Case सागरी मार्गाने आणि डार्कनेटच्या माध्यमातून तस्करी वाढली असताना भारतात गत पाच वर्षांत अंमलीपदार्थ जप्तीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे.

तसेच, अंमलीपदार्थांचे उत्पादन रोखण्यासाठी भारताने केलेल्या नियमांचीही दखल ‘आयएनसीबी’ने घेतली.‘आयएनसीबी’ने 2022 या वर्षासाठीचा आपला अहवाल आज सादर केला. या अहवालानुसार, जगभरात सागरी मार्गाने अंमलीपदार्थांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

मनोविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या अमलीपदार्थांच्या एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन पाच देशांमध्येच होते. त्यापैकी सर्वाधिक २४ टक्के उत्पादन भारतात होते, तर त्यानंतर चीन (२१ टक्के), अमेरिका (१८ टक्के), इटली (११ टक्के) आणि जर्मनी (७ टक्के) या देशांचा क्रमांक लागतो.

िंथेटिक ड्रग्जची वाढती मागणी : जगभरात फार्मास्युटिकल ओपिऑइड्‌स, बेकायदा पद्धतीने उत्पादन केलेले मेथांम्फेटॅमिन, एमडीएमए, किटामाइन यासारख्या सिंथेटिक ड्रग्जची मागणी वाढत आहे. या अंमलीपदार्थांचे बेकायदा उत्पादन करून त्यांचा जगभरात प्रसार करण्याचा तस्करांचा डाव असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापसा परिसरात मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग! एकूण खर्च रु.60 लाख, आतापर्यंत 65 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण

Goa Fuel Price Hike: महागाईच्‍या 'झळा'; गोमंतकीय जनतेला 'कळा'! इंधन दरवाढीचा फटका; दुधानंतर खाद्यतेल, भाज्‍या, फळे, फुलांच्‍या किमतीतही वाढ

Surya Gochar 2026: अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव अन् घरात आनंदाचे वातावरण, 'सूर्य गोचर' ठरणार वरदान; 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Panaji Tobacco Raid: पणजीत तंबाखूविरोधी धडक मोहीम; 13 गुन्हे दाखल, छुपी विक्री उघड; 3 हजारांचा दंड वसूल

Crime News: आधी शॉक दिला, मग पाजलं विष! अनैतिक संबंधाआड येणाऱ्या नवऱ्याचा बायकोनं काढला काटा; सख्खी बहीण अन् तिचा बॉयफ्रेंडही कटात सामील

SCROLL FOR NEXT