Chief Minister Basavaraj Bommai Dainik Gomantak
देश

मुंबई-कर्नाटक प्रदेशाच्या नावात होणार बदल: मुख्यमंत्री बोम्मई

'आम्ही हैद्राबाद-कर्नाटक प्रदेशाच्या नावामध्ये बदल करुन 'कल्याण कर्नाटक' (Kalyan Karnataka) असे केले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील बेळगाव सीमाविवाद सर्वांना ज्ञात आहे. यातच आता मुंबई-कर्नाटक प्रदेशाच्या नावामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर वाद उद्भवत असताना जुने नाव कायम ठेवण्यास काही गरज नसल्याचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी म्हटले आहे. 'आम्ही हैद्राबाद-कर्नाटक प्रदेशाच्या नावामध्ये बदल करुन 'कल्याण कर्नाटक' असे केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव कित्तूर-कर्नाटक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे' मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्योत्सवादरम्यान जाहीर केले आहे.

दरम्यान तब्बल 65 वर्षांपूर्वी कर्नाटक राज्याची निर्मिती झाली. मात्र मराठी भाषिक लोकसंख्या मोठ्याप्रमाणात असलेला बेळगाव जिल्हा आणि कर्नाटकमधील काही सीमावर्ती प्रदेश महाराष्ट्रामध्ये विलीन करण्याची मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारांकडून करण्यात आली. त्यावरुन दोन्ही राज्यातील राजकारण्यांनी सीमाभागाच्या मुद्यावरुन फक्त नि फक्त राजकारण केले. मात्र येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले होते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यांच्या समूहातील कित्तूर-कर्नाटक प्रदेश असे नाव देण्यामागचे कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई-कर्नाटक का म्हणायचे?

1956 मध्ये देशात राज्यपुनर्चना कायदा लागू झाला आहे. तेव्हाच या प्रदेशामध्ये बदल करण्यात आला असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कल्याण कर्नाटक प्रदेशासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये दुप्पट निधी करण्यात येणार आहे. त्यासाठी 3000 कोटीची तरतूद करण्यात येईल, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana: घरात लगीनघाई सुरु असतानाच आला हार्ट अटॅक! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता; पाहुणे परतले

VIDEO: गजराजाची स्टाईल! 'भाऊ टोपी घाल' म्हटल्यावर हत्तीनं घातली... सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

चक दे इंडिया! टीम इंडियाच्या लेकींनी इतिहास रचला, नेपाळचा पराभव करत जिंकला विश्वचषक Watch Video

Goa Live News: गोव्यात डिसेंबरपासून 'स्मार्ट मीटर' योजना! अंतिम प्रक्रिया सुरू: मंत्री सुदीन ढवळीकर

SCROLL FOR NEXT