Suicide Dainik Gomantak
देश

बदली रोखायची असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव, अधिकाऱ्याच्या जाचामुळे पतीची आत्महत्या

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या बोलण्याने दुखावलेल्या लाइनमनने घरासमोरच आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपी कनिष्ठ अभियंत्यालाही निलंबित करण्यात आले आहे. आरोपी कनिष्ठ अभियंत्याने लाइनमन गोकुळ प्रसादला पत्नीला आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते. आरोपी अभियंत्याने बोललेली हीच गोष्ट न आवडल्याने गोकुळने आत्महत्या केली. (The Lakhimpur officer told the employee to send his wife to me if he wanted to stop the transfer the husband committed suicide)

दरम्यान, प्रत्यक्षात लाईनमन गोकुळ प्रसाद यांची पालियामधून गोला खांडमध्ये बदली झाली होती. लाइनमनने कनिष्ठ अभियंता नागेंद्र कुमार (Nagendra Kumar) यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत बदली थांबवण्यास सांगितले. त्यामुळे जेई नागेंद्र यांनी लाच म्हणून गोकुळ प्रसादकडे पत्नीला एका रात्रीसाठी आपल्याकडे पाठवावे, अशी मागणी केली. यामुळे गोकुळ इतका दुखावला की, त्याने जेईच्या घरासमोर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गोकुळ प्रसादचा मृत्यू झाला.

मात्र, मृत्यूपूर्वी गोकुळ प्रसादचा पोलिसांत जबाब नोंदवून घेतला. दरम्यान गोकुळने जेईचा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जेई नागेंद्र आणि एका लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आरोपी जेईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Goa Politics: खरी कुजबुज; सिनेप्रेम ठीक आहे हो, परंतु पार्किंगचे काय?

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT