Haryana Chief Minister Manohar Lal Khattar Dainik Gomantak
देश

Haryana: विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी शाळांमध्ये होणार समुपदेशकांची नियुक्ती

हरियाणा सरकारने (Haryana Government) सोमवारी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक

हरियाणा सरकारने सोमवारी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar) यांनी ट्विट करत म्हटलं की, "हरयाणा सरकारने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये (School) कार्यरत असलेल्या कायमस्वरुपी पीजीटी ( Psychology) शिक्षकांमधून या समुपदेशकांची निवड केली जाईल. (The Haryana Government Will Appoint Counsellors In Schools To Keep Students Stress Free)

वास्तविक, राज्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये समुपदेशकांची नियुक्ती केली जाईल, यासाठी हरियाणा सरकारने आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात नियुक्त झालेल्या शिक्षकांची समुपदेशक पदावर प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली जाईल, मात्र त्यापूर्वी त्यांची मानसोपचार चाचणी घेतली जाईल. त्याच वेळी, विभाग प्रत्येक ब्लॉकमध्ये एक समुपदेशक कक्ष स्थापन करेल, त्यात नियुक्त केलेले समुपदेशक दररोज दोन-तीन शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना (Students) करिअरशी संबंधित मार्गदर्शन करून तणावमुक्त करतील. जेणेकरुन ते विषय ओळखतील. विद्यार्थ्यांना स्वारस्य आणि करिअरशी संबंधित सूचनाही ते देतील.

शाळांमधील अभ्यासामुळे बहुतांश विद्यार्थी तणावाखाली

दरम्यान, बहुतांश विद्यार्थी शाळांमधील अभ्यासाबाबत तणावाखाली असतात. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीचा सर्वाधिक ताण राहतो. याशिवाय दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विषय निवड, करिअर बाबत विद्यार्थ्यांमध्ये तणाव असतो. अनेकवेळा विद्यार्थ्याची आवड दुसऱ्या विषयात असली तरी घरच्यांच्या दबावामुळे त्यांना इंटरेस्टिंग विषयात प्रवेश घेता येत नाही, त्यामुळे त्यांना चांगली कामगिरीही करता येत नाही. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हे लक्षात घेऊन सीएम खट्टर यांनी समुपदेशक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

NISA ने हरियाणात शाळा उघडण्याची मागणी केली

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नुकतेच NISA चे अध्यक्ष कुलभूषण शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हरियाणा सरकारकडे नर्सरी ते 12वी पर्यंतच्या शाळा तातडीने सुरु करण्याची मागणी केली. ते पुढे म्हणाले, देशातील 70 टक्के मुलांना बंदचा फटका बसला आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेले शालेय शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी नर्सरी ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु कराव्यात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शाळांना कोविड-19 महामारीचा सामना करावा लागत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT