Dainik Gomantak
देश

डेंग्यूचा वाढता प्रभावा थांबवण्यासाठी केंद्र सरकार कठोर

डेंग्यूचा वाढता प्रभाव लक्षात घेवून केंद्र सरकारने 9 राज्ये आणि केद्रशासित प्रदेशामध्ये उच्चस्तरीय पथके पाठवली आहेत.

दैनिक गोमन्तक

देशातील अनेक भागात कोरोना संसर्गासहच आता डेंग्युचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे. यावेळी सरकारने 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उच्च-स्तरीय टीम पाठवल्या आहेत, जिथे डेंग्यू सर्वाधिक वाढला आहे. या टीममध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय वेस्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रॅमचे अधिकारी सामाविष्ट आहेत. अलीकडेच 1 नोव्हेंबररोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुक माडविया यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत देशातील डेंग्यूच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. माडविया यांनी सांगितले की अनेक गरीब लोक डेंग्यू आजाराला बळी पडले आहेत आणि प्लेटलेटची संख्या कमी असल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे.

* डेंग्यूचे वाढते प्रमाण

सध्या राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये डेंग्यूची प्रमाण अधिक आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, डेंग्यू या आजाराच्या मुळात जाण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तपासणी करणे. लोकांची तपासणी करून योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दिल्लीमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

* महाराष्ट्र आणि चंदीगडमध्ये वाईट परिस्थिती

महाराष्ट्रामधील पुणे महानगरपालिकेने ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 168 रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये नोंद झालेल्या 192 रुग्णापेक्षा हे प्रमाण कमी असले तरी त्यात थोडीशी घट आहे. आतापर्यंत या आजाराने चंदीगडमध्ये 33 जणांचा बळी घेतला आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आलेल्या डेंग्यूछ्या रुग्णाची संख्या गेल्या तीन वर्षातील वार्षिक रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या वेळी पूर्वीपेक्षा जास्त रुग्ण समोर अली आहेत.

* गाझियाबादमध्येही एक हजार केसेस

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये डेंग्यूच्या रुग्णाची संख्या आधीच एक हजाराच्या जवळपास आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, यापैकी सुमारे 68 टक्के केसेस ओक्टोबर महिन्यात अली आहेत. डेंग्यूचा संसर्ग एडिस प्रजातीच्या डास चवळल्याने होतो. ताप, अंगदुखी, मळमळ, उलट्या यासारखे या आजारचे लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT