Bride Dainik Gomantak
देश

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी बाईने लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन काढला पळ

नवविवाहित वधू (Bride) नातेवाईकाच्या घरातून 42 हजारांची रोकड आणि लाखोंचे दागिने घेऊन पळून गेली.

दैनिक गोमन्तक

विवाह (Marriage) हे एक पवित्र बंधन आहे. या बंधातून जोडप्याचे नवीन आयुष्य सुरु होते. मात्र या बंधनाच्या नावाखाली लुटमारीचा धंदा सुरु आहे, याचेच उदाहरण ग्रेटर नोएडातील दनकौर शहरात पहायला मिळाले. नवविवाहित वधू (Bride) नातेवाईकाच्या घरातून 42 हजारांची रोकड आणि लाखोंचे दागिने घेऊन पळून गेली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दनकौर कोतवालीमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलीस या तक्रारीवरुन तपास करत आहेत. (The bride in Greater Noida fled from a relative's house with Rs 42,000 in cash and lakhs of jewellery)

दरम्यान, दनकौर शहरातील सालारपूर रोड येथील रहिवासी ललित मलिक यांनी कोतवाली दनकौरमध्ये तक्रार दाखल केली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील सियानामध्ये राहणारा त्याचा मेहुणा कृष्णपाल त्याच्यासोबत सध्या राहत आहे. कृष्णपाल हा ग्रेटर नोएडामधील एका कंपनीत काम करत आहे. यावेळी त्याने सांगितले की, 21 मार्च रोजी त्याने बुलंदशहरमधील जहांगीरपूर येथे राहणाऱ्या एका तरुणीशी लग्न केले होते.

तसेच, दनकौर कोतवालीचे प्रभारी सुधीर कुमार यांनी सांगितले की, ''ललितने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, मंगळवारी रात्री उशिरा कुटुंबीय झोपले होते. त्याचवेळी नववधूने घरातून 42 हजार रुपयांची रोकड आणि लाखोंच्या दागिन्यांसह इतर मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढला. बुधवारी पहाटे कुटुंबीयांना जाग आली तेव्हा नववधू दिसलीच नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिचा थांग पत्ता लागला नाही. काही वेळाने घरात सामान विखुरलेले असल्याचे कुटुंबीयांना दिसले. घरातून रोख रक्कम आणि दागिने गायब झाल्याचे कळून आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. परंतु काही सुगावा लागला नाही.'' कोतवालीचे प्रभारी सुधीर कुमार यांनी पुढे सांगितले की, 'पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT