Delhi Assembly

 

Dainik Gomantak 

देश

दिल्ली विधानसभेला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची भाजपने केली मागणी

भाजपने विधानसभेचे नाव मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून बदलत आहे. आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय नेते एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारने अलहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज केले होते. यातच आता भाजपने (BJP) दिल्ली विधानसभेचे (Delhi legislative Assembly) नाव बदलण्याची मागणी केली आहे.

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, भाजपने विधानसभेचे नाव मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली आहे. याशिवाय लक्ष्मी नगरमधील भाजप आमदार अभय वर्मा (BJP MLA Abhay Verma) यांनी लक्ष्मी नगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलून ‘शकरपूर-लक्ष्मी नगर’ (Laxmi Nagar metro station) मेट्रो स्थानक करण्याची मागणी केली.

दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. दिल्ली विधानसभेच्या विशेष हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस भाजपने नाव बदलण्याच्यामागणीने गाजवला. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरुन विधानसभेचे नाव बदलण्याची मागणी दिल्लीतील घोंडामधील भाजप आमदार अजय कुमार महावर (BJP MLA Ajay Mahawar) यांनी सभागृहात केली. त्याचवेळी लक्ष्मीनगरचे भाजप आमदार अभय वर्मा यांनी लक्ष्मी नगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलून ‘शकरपूर-लक्ष्मी नगर’ मेट्रो स्थानक करण्याची मागणी केली.

'आप'ने दिल्ली महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला

याशिवाय दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा यांनी दिल्ली महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एमसीडीमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी विधानसभेत सांगितले की, दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, लूट आणि लूटमार सुरु आहे, मात्र यावर कधीही चर्चा होत नाही. एमसीडी ही घटनात्मक व्यवस्था आहे. दिल्लीत केजरीवाल सरकार स्थापन झाले तेव्हा दिल्ली वित्त आयोगही स्थापन झाला नव्हता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोनाची चाचणी करुन इतरांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, 'मला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र किरकोळ लक्षणे आहेत. मी घरात एकटाच राहतो. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कृपया स्वतःला इतरांपासून दूर ठेवावे आणि तात्काळ कोरोना चाचणी घ्यावी.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांना पहिल्यांदाच कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

शिवाय, सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, संपूर्ण कुटुंबाची तपासणी करण्यात आली आहे. ते आणि त्यांचे कुटुंब स्वतंत्र राहतात. मुख्यमंत्र्यांसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चाचणी करुन वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, परिवहन मंत्री कैलाश गेहलोत आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्यासह केजरीवाल मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री गेल्या वर्षी संसर्गग्रस्त आढळले होते. डेहराडूनमध्ये रॅली काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केजरीवाल यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT