Night curfew Dainik Gomantak
देश

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; बेळगावसह 'या' जिल्ह्यातील हटवला नाईट कर्फ्यू

कोडगू, हसन, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रात्रीच्या संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचं (Covid 19) सावट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे केंद्र सरकारबरोबर (Central Government) राज्य सरकारने निर्बंध हटवू लागली आहेत. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही आहेच. यातच आता खबरदारीचा उपाय म्हणून देशातील अनेक राज्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्नाटक राज्याने (State of Karnataka) संचारबंदी (Night curfew) लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कोडगू, हसन, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रात्रीच्या संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. कोडगू आणि दक्षिण कन्नड हे जिल्हे शेजारी असणाऱ्या केरळ राज्याला लागून आहेत.

देशात कोरोना संसर्गाची स्थिती काय आहे?

देशभरात कोरोनाची 36,083 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, 37,927 लोक या प्राणघातक आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांमध्ये 493 मृत्यूंची नोंद झाली आहे. ताज्या प्रकरणांमध्ये, संसर्गाचा दर 1.73 टक्के नोंदवला गेला. त्याच वेळी, देशभरात सक्रिय प्रकरणे (Active Case) म्हणजे उपचार घेत असलेल्या लोकांची संख्या 3,85,336 वर पोहोचली आहे. लसीकरणाबद्दल बोलताना, भारतात कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरणांची संख्या 54,38,46,290 पार केली आहे. अहवालानुसार, 24 तासात 73,50,553 लोकांना लस देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT