Terrorist attacks in Rajouri & Kulgam in Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशात दहशतवाद पुन्हा सक्रिय, दिल्लीतही हाय अलर्ट

गुरुवारी जम्मू -काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाममध्ये (Kulgam) दहशतवाद्यांनी बीएसएफच्या(BSF) ताफ्यावर हल्ला केला आहे.

दैनिक गोमन्तक

स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पूर्व संध्येला देशात पुन्हा एकदा दहशतवादाने (Terrorism) डोके वर काढायला सुरूवात केली आहे. दहशतवादी(Terrorist) पुन्हा भारताच्या अनेक ठिकाणाला आपले लक्ष बनवताना दिसत आहेत. कालपासून दहशतवादी काश्मीर (Jammu-Kashmir) खोऱ्यात पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहेत. काल रात्री दहशतवाद्यांनी राजौरी (Rajouri) शहरातील खंडली पुल भागात भाजपचे मंडल अध्यक्ष जसबीर सिंह यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला आहे. तर गुरुवारी जम्मू -काश्मीरच्या कुलगाममध्ये (Kulgam) दहशतवाद्यांनी बीएसएफच्या(BSF) ताफ्यावर हल्ला केला आहे. (Terrorist attacks in Rajouri & Kulgam in Jammu Kashmir)

या हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी लष्करच्या दोन दहशतवाद्यांना घेरले असून दहशतवाद्यांबरोबर संपूर्ण रात्रभर चकमक सुरू होती. यात भारतीय सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले असून चकमक क्षेत्रातून 22 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बीएसएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हा हल्ला महामार्गावरही झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत दोन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे .

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले आहे की, काल दुपारी तीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर कुलगामच्या मालपोरा मीर बाजार क्षेत्राजवळ गोळीबार केला. मात्र, पोलिस आणि सुरक्षा दलांच्या रोड ओपनिंग पार्टीने (आरओपी) प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी पोलीस आणि लष्कराचे दल तातडीने त्या भागात पोहोचले आणि तो संपूर्ण परिसर ताब्यात . मात्र, अतिरेक्यांनी जवळच्या एका मोठ्या इमारतीत आश्रय घेतला होता .

"दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे, एक सीआरपीएफ, एक लष्करी जवान आणि दोन नागरिकांना गोळ्या लागल्या आणि सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ऑपरेशन चालू आहे आणि त्याला वेळ लागू शकतो कारण ज्या इमारतीमध्ये दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे ती एक मोठी काँक्रीटची इमारत आहे.

दरम्यान दुसरीकडे गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी राजौरी शहरातील खंडली पुल भागात भाजपचे मंडल अध्यक्ष जसबीर सिंह यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात जसबीर सिंगचा तीन वर्षांचा पुतण्या ठार झाला आणि त्याच्या पालकांसह कुटुंबातील इतर सहा सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.

तर आता दिल्लीत ही पोलिसांनी अलर्ट जरी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा तयारीत आहेत. आता एजन्सींनी याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले असून सुरक्षा एजन्सीने इशारा दिला आहे की 15 ऑगस्टपूर्वी दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्नात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT