Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला!

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. इथे पूंछ सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी खोऱ्यात लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही

शुक्रवारी संध्याकाळी संशयित दहशतवाद्यांनी जंगल परिसरात लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरु केली. यासोबतच संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यानंतर सुरक्षा दलाने पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरु केले.

21 डिसेंबर 2023 रोजी मोठा हल्ला झाला

याआधी 21 डिसेंबर 2023 रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. राजौरी येथे हा हल्ला झाला, ज्यात लष्कराचे 4 जवान शहीद झाले, तर तीन जवान जखमी झाले. दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता. जम्मू-स्थित संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दलच्या गुप्त माहितीच्या आधारे आदल्या रात्री थानमंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली या भागात संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. यानंतर तिथे चकमक सुरु झाली. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास लष्कराच्या दोन गाड्या ऑपरेशनच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या, ज्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर लष्कराने देखील कारवाई सुरु केली होती. या कारवाईदरम्यान लष्कराचे 4 जवान शहीद झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT