ED  Dainik Gomantak
देश

Terror Funding: टेरर फंडिंग प्रकरणी ईडीने हिजबुल दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र केले दाखल

Terror Funding: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काश्मीरमधील दहशतवादी निधीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.

Manish Jadhav

Terror Funding ED Files Charge Sheet Against Hizbul Terrorists: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काश्मीरमधील दहशतवादी निधीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काही हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांची नावे आहेत. ईडीने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 25 जानेवारी रोजी श्रीनगरमधील विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, आरोपींमध्ये मुदस्सीर अहमद शेख, मुश्ताक अहमद काम्बे आणि मोहम्मद इक्बाल खान यांचा समावेश आहे.

आरोपपत्र कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे?

ईडीने सांगितले की, न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली आहे आणि आरोपींविरुद्ध खटला सुरु करण्यासाठी नोटीस बजावली आहे. ED चे मनी लाँड्रिंग प्रकरण जम्मू आणि काश्मीर पोलिस (कुलगाम जिल्हा) ने मुदस्सीर अहमद शेख, मुश्ताक अहमद काम्बे, मोहम्मद इक्बाल खान, मोहम्मद अब्बास शेख आणि तौसीफ अहमद शेख यांच्या विरोधात जुलै 2015 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. हा एफआयआर भारतीय दंड संहिता आणि UAPA अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अब्बास शेख आणि तौसिफ अहमद शेख ठार झाले होते.

तीन 'हायब्रीड' दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करताना तीन 'हायब्रीड' दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले होते की, 'हायब्रिड' दहशतवादी असे आहेत जे हल्ले करतात आणि नंतर पुन्हा नियमितपणे जीवन जगतात. ते म्हणाले की, सोशल मीडिया ग्रुप्सवर पाळत ठेवून उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बोनियार भागातून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, ज्यामुळे प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठी घटना टळली.

ढांगरी दहशतवादी हल्ल्यात एक तरुण पकडला गेला होता

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात 2023 मध्ये झालेल्या ढांगरी दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात एका किशोरवयीन तरुणाला अटक केली होती. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, तरुणाला पकडण्यापूर्वी याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी 1 जानेवारीला दहशतवाद्यांनी ढांगरी गावात हल्ला करुन अंदाधुंद गोळीबार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

Sudin Dhavalikar: '..जाल्यार फर्मागुडी जातले शिक्षणिक हब'; वीजमंत्री ढवळीकर Video

SCROLL FOR NEXT