Rise in temperature Dainik Gomantak
देश

एप्रिलमध्येच वाढणार भारतात तापमान, पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता

या वर्षी उन्हाळ्याचे दिवस देशात अकालीच दार ठोठावत आहेत. मार्चमध्येच मे प्रमाणे कमाल तापमान वाढले होते आणि आता एप्रिलमध्येही तेच तापमान वाढणार आहे.

दैनिक गोमन्तक

या वर्षी उन्हाळ्याचे दिवस देशात अकालीच दार ठोठावत आहेत. मार्चमध्येच मे प्रमाणे कमाल तापमान वाढले होते आणि आता एप्रिलमध्येही तेच तापमान वाढणार आहे. यावेळी उन्हाचा तडाखा तीव्र असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवस उत्तर भारत, मध्य भारत आणि पश्चिम भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमानात वाढ होऊन नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. (Temperature in India will rise in April with heat waves expected in next five days)

1 एप्रिलनंतर मात्र वायव्य भारतातील काही भागात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे. मात्र इतर भागात उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे हाल होणार आहेत. दुसरीकडे, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या काही भागात 1 ते 4 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. या दरम्यान या राज्यांमध्ये तापमानात घट नोंदवली जाईल.

गुरुवारी मध्य प्रदेशातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. भोपाळ, जबलपूर, गुना, खरगोन, राजगढ, रतलाम, छिंदवाडा, मंडला, रीवा, सतना, सिवनी, सिधी, उमरिया आणि छतरपूर जिल्ह्यात खजुराहोमध्ये उष्णतेची लाट होती. हवामान केंद्राने सांगितले की, शुक्रवारी काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, परंतु उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

राजस्थानमधील जयपूरसह विविध ठिकाणी गुरुवारी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. राज्यातील अनेक भाग अनेक दिवसांपासून उष्ण वाऱ्यांच्या तडाख्यात आहेत. हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे की एप्रिलमध्ये उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारत आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्प भारत, पूर्व भारतातील अनेक भाग आणि ईशान्य भारताच्या लगतच्या भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

SCROLL FOR NEXT