Crime Dainik Gomantak
देश

Telangana त खूनी सत्र सुरुच, TRS कार्यकर्त्याची हत्या; संशयितांच्या घरावर दगडफेक

TRS Workers: तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका गावात सोमवारी सत्ताधारी टीआरएसच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Telangana Crime: तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका गावात सोमवारी सत्ताधारी टीआरएसच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तम्मिनेनी कृष्णय्या हे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहून आपल्या दुचाकीवरुन घरी परतत होते.

यादरम्यान, एका ऑटोतील चार जणांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना अडवले. त्यानंतर ऑटोमधील अज्ञातांनी कृष्णय्या यांची हत्या केली. यानंतर घटनास्थळावरुन या अज्ञातांनी पळ काढला, असे अधिकाऱ्याने सांगितले. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी (Police) विशेष पथक तयार केले आहे.

दुसरीकडे, मृत व्यक्तीच्या समर्थकांनी दुसऱ्या राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. कृष्णय्या यांच्या हत्येच्या कटात या व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय त्यांना आहे.

तसेच, घटनास्थळाजवळच फरार व्यक्तीचे घर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, फरार झालेल्या व्यक्तीवर खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT