प्रसिद्ध टेक कंपनी TCL कंपनीनं भारतात जगातील सर्वात मोठा 115 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा जगातील सर्वात मोठ्या स्क्रीन आकाराची टीव्ही असल्याचा, दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
QD Mini LED TV मध्ये तुम्हाला 144Hz रिफ्रेश रेटसह स्क्रीन मिळेल. शिवाय, टीव्ही AiPQ Pro प्रोसेसरने सुसज्ज आहे. TCL कंपनीनं QD Mini LED TV असं या प्रोडक्टला नाव दिलं आहे.
तुम्हाला हा टीव्ही घ्यायचा असल्यास 29,99,990 रूपये मोजावे लागतील. समोर आलेल्या माहितीनूसार, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, Amazon, Flipkart वर टीव्हीची विक्री लवकरच सुरू होणार आहे. टीव्हीच्या खरेदीवर कंपनी ७५ इंचाचा QLED टीव्ही मोफत देत आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.
TCL QD Mini LED TV मध्ये 115-इंच लांबीची मोठी स्क्रीन असणार आहे. या टीव्हीचा रीफ्रेश रेट 144Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये 4K रिझोल्यूशन आहे. त्याबरोबरच, यात HDR5000 nits, HDR10, TUV ब्लू लाईट आणि TUV फ्लिकर फ्री सपोर्ट देखील आहे.
यात ALLM म्हणजेच ऑटो लो लेटन्सी मोड उपलब्ध आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे तुमचा टीव्ही पाहण्याचा अनुभव सिनेमा हॉलसारखा होईल.
जर तुम्हाला गेमिंग आवडत असेल तर हा टीव्ही तुमच्या खेळाचा अनुभव अनेक पटींनी वाढवेल. या टीव्हीमध्ये गेम मास्टर तंत्रज्ञान, ALLM (ऑटो लो लेटन्सी मोड) आणि मल्टी-व्ह्यू २.० सारखे वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मल्टी-व्ह्यू २.० च्या मदतीने तुम्ही एकाच वेळी दोन वेगवेगळी कामं करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.