Resigned Letter Viral Dainik Gomantak
देश

टाटा बाय बाय! 'मजा नहीं आ रहा है' म्हणत या व्यक्तीने दिला राजीनामा, लेटर व्हायरल

नोकरी सोडण्याचे धाडस करणारे फार कमी लोक आहेत कारण नोकरीशिवाय जगणे मात्र कठीण आहे.

दैनिक गोमन्तक

आजच्या काळात, लोकांसाठी पैसे कमवण्यापेक्षा नोकरीचे समाधान खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच नोकरीत मिळणारे समाधान, आनंद आणि शांती हे पैश्यापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. अनेक लोक नोकरीच्या गुंतागुंतीमुळे इतके त्रस्त होतात की ते डिप्रेशनमध्ये जाऊ लागतात. नोकरी सोडण्याचे धाडस करणारे फार कमी लोक आहेत कारण नोकरीशिवाय जगणे मात्र कठीण आहे. (Tata bye bye Saying Im not having fun this person resigned the letter went viral)

तसेच, उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) सोशल मीडियावर अनेकदा विचित्र पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या अनेक पोस्ट्स इतक्या मजेदार असतात की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अलीकडेच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे जो ऑफिसमध्ये राजेश नावाच्या व्यक्तीने दिलेला राजीनामा आहे असे दिसून येते आहे. सहसा ऑफिसमध्ये मेलद्वारे किंवा लिखित स्वरूपात ठरलेल्या पद्धतीने राजीनामे दिले जातात. पण हर्ष यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यात त्या व्यक्तीने तो राजीनामा देत असल्याचं अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे.

विचित्र राजीनाम्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हर्ष यांनी शेअर केलेला राजीनामा राजेश नावाच्या व्यक्तीचा आहे. या पत्रात त्यांनी ते का लिहित आहे ते अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याने लिहिले- "प्रिय सर, मी राजीनामा देत आहे, मला मजा येत नाही आहे." या पत्रासोबत 18 जूनची तारीखही त्यामध्ये लिहीली आहे. हा विचित्र राजीनामा पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. बरं, कोणीतरी विचित्र पद्धतीने राजीनामा करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही राजीनाम्याशी संबंधित काही पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

हे पत्र खरे आहे का?

या पोस्टला 2 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर अनेकांनी रिट्विट देखील केले आहे. अनेकांनी कमेंट करून यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. इतर लोकांप्रमाणे तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की हा राजीनामा खरा आहे की कोणीतरी ते असंच लिहिल आहे? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पाहिले तर दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीने लिहिले आहे की- "सर, तुमचे हस्ताक्षर अगदी स्पष्ट आहे, मज्जा आली." या कमेंटला उत्तर देताना हर्ष यांनी लिहिले आहे की, "तुम्ही मला पकडले आहे."

आता हे ऐकून असं वाटतंय की हा राजीनामा खरा नसून हर्ष गोएंका यांनी तो स्वत: लिहून पोस्ट केला आहे. मात्र, या पोस्टसोबत त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनवरून त्यांना या पोस्टच्या माध्यमातून कंपनीतील मालक आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाच काही तरी संदेश द्यायचे असल्याचे दिसून येते. त्यांनी लिहिले- "हे पत्र लहान आहे पण त्याचा अर्थ खूप खोल आहे, ही एक गंभीर समस्या आहे जी आपण सर्वांनी सोडवलीच पाहिजे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT