Rohit Sharma Dainik Gomantak
देश

T20 World Cup: शानदार विजयानंतर हिट मॅनचं विजयी सेलिब्रेशन, मैदानात गाढला 'तिरंगा'; हार्दिकला दिली जादू की झप्पी

T20 World Cup: भारतीय संघ गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची चातकासारखी वाट पाहत होता. मात्र, भारताने शनिवारी 29 जून रोजी T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले.

Manish Jadhav

T20 World Cup: भारतीय संघ गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची चातकासारखी वाट पाहत होता. तर हा संघ तब्बल 17 वर्षांपासून टी-20 विश्वचषक जिंकण्यापासून वंचित होता. मात्र, शनिवारी (29 जून रोजी) भारतीय संघाने T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. खासकरुन फायनलमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाला विजय मिळवून देण्यात सिहांचा वाटा उचलला. अशा प्रकारे भारताने तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्यासमोर आफ्रिकेचा संघ 169 धावाच करु शकला.

दरम्यान, सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहितला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्याने मैदानात आनंदोत्सव साजरा केला. रोहित आणि विराट एकमेकांना मिठी मारुन रडले. एवढचं नाहीतर हार्दिक पांड्याच्या गालाचे चुंबन घेत रोहितने त्यालाही मिठी मारली. फायनल सामन्यानंतर हे भावूक क्षण अवघ्या क्रिकेटविश्वाने पाहिले.

1. रोहितने मैदानात गाढला 'तिरंगा'

टी-20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, 'टी-20 विश्वचषकात आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोसमध्ये भारतीय तिरंगा गाढू.' सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने असेच केले आणि जय शाह यांचा विश्वास त्याने सार्थ करुन दाखवला. यावेळी जय शहा देखील उपस्थित होते.

2. विराट आणि रोहित एकमेकांना मिठी मारुन रडले

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट आणि रोहितने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करुन क्रिकेटविश्वाला सुखद धक्का दिला. फायनल सामना जिंकल्यानंतर विराट आणि रोहितने एकमेकांना मिठी मारुन आनंद साजरा केला. यावेळी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. दीर्घकाळ T-20 क्रिकेट खेळल्यानंतर दोघांनीही या फॉरमॅटला अलविदा केला.

3. रोहितने हार्दिकला जादू की झप्पी दिली

महत्त्वाच्या क्षणी 3 विकेट्स घेत सामना भारताच्या बाजूने फिरवणाऱ्या हार्दिक पांड्याला कर्णधार रोहितने जादू की झप्पी दिली. एवढचं नाहीतर रोहितने हार्दिकच्या गालाचे चुंबनही घेतले. या क्षणी हार्दिकच्या डोळ्यात अश्रू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT