Suvendu Adhikari Dainik Gomantak
देश

Suvendu Adhikari: बंगालमध्ये 17 लाख 'बनावट' मतदार; सुवेंदू अधिकारी यांनी ECI कडे सोपवली लिस्ट!

Fake Voters In West Bengal: पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी राज्यातील सुमारे 17 लाख कथित बनावट मतदारांची यादी भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) सुपुर्द केली.

Manish Jadhav

Suvendu Adhikari Submits List Of 17 Lakh Fake Voters In West Bengal to ECI: पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी राज्यातील सुमारे 17 लाख कथित बनावट मतदारांची यादी भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) सुपुर्द केली. अधिकारी बुधवारी 'बनावट' मतदारांची यादी असलेल्या 24 बॅग घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्या कार्यालयात पोहोचले. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ओळखलेल्या बनावट मतदारांची नेमकी संख्या 16,91,132 असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, या यादीत मृत मतदारांची तसेच इतरत्र स्थलांतरित झालेल्यांची नावे असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. अनेक ठिकाणी यादीत नावे आल्याचीही उदाहरणे आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बनावट मतदारांची संख्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील फरकाइतकीच असल्याचा दावाही त्यांनी केला.

सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, 14,267 पानांची कागदपत्रे जमा करण्याव्यतिरिक्त, आम्ही डिटेल्स पेन-ड्राइव्हमध्ये संग्रहित सॉफ्ट-कॉपी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केले आहे. ECI ची टीम मार्चमध्ये पश्चिम बंगालला भेट देणार असून सर्व राजकीय पक्षांसोबत बैठका घेणार आहे. या अनियमिततेबाबत आम्ही संपूर्ण सहकार्य या टीमला करु. तथापि, तृणमूल काँग्रेस नेतृत्वाने हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT