Saraswati Das Dainik Gomantak
देश

कोलकात्यात आणखी एका मॉडेलचा संशयास्पद मृत्यू

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून कोलकाता शहरात महिला मॉडेलच्या मृत्यूचं सत्र सुरू आहे. गेल्या आठवड्यात बिदिशा मुजुमदार, मॉडेल मंजुषा, पल्लवी डे यांनी गेल्याच आठवड्यात आत्महत्या केल्या होत्या. याबाबत पोलीस अधिक तपास ही करत आहेत. असे सुरु असतानाच यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. कारण रविवारी सकाळी पुन्हा 18 वर्षीय मॉडेलने राहत्या घरात आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. (Suspicious death of another model in Kolkata )

रविवारी सकाळी कसबा परिसरात सरस्वती दास या 18 वर्षीय मॉडेलने राहत्या घरात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सरस्वती ही मेकअप आर्टिस्ट देखील होती. काही छोट्या उपक्रमांसाठी मॉडेलिंग केलं होतं. शनिवारी रात्री तिने आपल्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसत असले तरी अन्य बाजूंनी तपास होणं आवश्यक असल्याच पोलीसांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सरस्वतीच्या आजीने तिला सर्वप्रथम लटकलेल्या अवस्थेत आणि तातडीने चाकुने फास कापला आणि तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी सरस्वतीचा मोबाइल ताब्यात घेतला असून त्याचा बारकाईने तपास केला जात आहे. तसेच यापुर्वी आत्महत्या केलेल्या सिनेकलाकारांच्या मृत्यूमध्ये काही समान धागा आहे का ? याचा ही तपास पोलीस करत आहेत.

गेल्या आठवड्यात बुधवारी बिदिशा मुजुमदार हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी बिदिशाची 26 वर्षीय मैत्रीण आणि मॉडेल मंजुषा आपल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. बिदिशाच्या मृत्यूमुळे ती अस्वस्थ होती, अशी माहिती मंजुषाच्या आईनं पोलिसांना दिली होती. तर पल्लवी डे नावाची अन्य एक मॉडेल 15 मे रोजी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT