Viral Video Of Husband Wife Fight In Mall X, @gharkekalesh
देश

Viral Video: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून मॉलमध्ये राडा, पत्नीने पतीसह दुसऱ्या महिलेलाही धुतले

Husband Wife Fight In Mall: पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका पत्नीला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल माहिती मिळाली आणि तिने एका शॉपिंग मॉलमध्ये दोघांचा समाचार घेतला.

Ashutosh Masgaunde

Viral Video Of Husband Wife Fight In Mall:

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला एका पुरुषाला कानाखाली मारताना दिसत आहे. तसेच या व्यक्तीला मारल्यानंतर ती दुसऱ्या एका महिलेवर हल्ला करतानाही दिसत आहे.

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या X यूजरने शेअर केला आहे . पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, घटनेचे नेमके ठिकाण निश्चित नाही.

पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका पत्नीला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल माहिती मिळाली आणि तिने एका शॉपिंग मॉलमध्ये दोघांचा समाचार घेतला.

व्हिडिओमध्ये पत्नी पहिल्यांदा पतीला कानाखाली मारते, तिची पडलेली बॅग उचलते आणि निघून जाताना पतीची बरोबर असलेल्या दुसऱ्या महिलेचे केस ओढत खाली पाडते आणि निघून जाते. नंतर तो पुरुष हल्ला झालेल्या महिलेला उठण्यास मदत करत असल्याचे दिसत आहे.

पती-पत्नीच्या वादाजे मजेशीर प्रकरण

दरम्यान उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातही पती-पत्नीच्या वादाचे एक मजेदार प्रकरण समोर आले आहे. पती-पत्नीमध्ये हा वाद मोमोजवरून झाला आहे. पती कामाहून घरी परत येताना मोमोज आणत नसल्याने पत्नीने पतीला घटस्फोट देण्यासाठी पोलिसांत तक्रार केली. एवढेच नाही तर संतापलेली पत्नी माहेरी निघून आली होती.

हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचल्यावर पती-पत्नी दोघांनाही बोलावण्यात आले. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पत्नीने जे सांगितले ते ऐकून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. मात्र, नंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

SCROLL FOR NEXT