Ebola Virus Case Dainik Gomantak
देश

Ebola Virus Case: राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा पहिला संशयित रुग्ण; युगांडाच्या महिला पर्यटकामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

Suspected Ebola Virus Case Rajasthan: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 'इबोला व्हायरस'चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली.

Manish Jadhav

Suspected Ebola Virus Case Rajasthan: देशात कोरोना आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका कमी झालेला असतानाच, आता एका अत्यंत घातक आंतरराष्ट्रीय विषाणूने भारताची चिंता वाढवली. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 'इबोला व्हायरस'चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. युगांडातून जयपूर येथे पर्यटनासाठी आलेली एक परदेशी महिला इबोला सदृश लक्षणांनी ग्रस्त असल्याचे समोर आले.

या घटनेची माहिती मिळताच जयपूरच्या आरोग्य विभागाने अत्यंत तातडीने पावले उचलत या महिलेला जयपूरमधील आरयूएचएस (RUHS) रुग्णालयात भरती केले असून, तिला विशेष आयसोलेशन वार्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवले. या महिलेचा फायनल मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत रुग्णालय प्रशासन आणि संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही परदेशी महिला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास 'एअर अरेबिया'च्या विमानाने शारजाहमार्गे जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली होती. विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नियमित आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंग सुरु असताना, तेथील वैद्यकीय पथकाला या महिलेमध्ये इबोला संसर्गाची अत्यंत तीव्र आणि संशयास्पद लक्षणे आढळून आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानतळ प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ रुग्णवाहिका बोलावून तिला थेट आरयूएचएस रुग्णालयात रवाना केले.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल गुप्ता यांनी या प्रकरणावर अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, सध्या या महिलेला विशेष वैद्यकीय देखरेखीखाली आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले असले, तरी अद्याप तिच्यात इबोला संसर्गाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या आजाराचे अचूक निदान करण्यासाठी महिलेच्या (Women) रक्ताचे आणि इतर आवश्यक नमुने (Samples) तातडीने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुण्याच्या लॅबमधून रिपोर्ट आल्यानंतरच या महिलेला इबोला झाला आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

दुसरीकडे, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आवश्यक प्रोटोकॉल लागू केले आहेत. संशयित रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाला आणि डॉक्टरांना विशेष पीपीई किट आणि सुरक्षा साधने वापरण्याचे तसेच अत्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरु नये, यासाठी आरोग्य विभागाने जनतेला कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांवरुन पसरणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका; केवळ सरकारी आणि अधिकृत हेल्थ बुलेटिनमधील माहितीच खरी माना, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

SCROLL FOR NEXT