Suryakumar Yadav Sixes Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) सुरु होत आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल. यात कर्णधार सूर्यकुमार यादव याचे नाव आघाडीवर आहे, कारण आशिया चषक 2025 मध्ये त्याचा फॉर्म अपेक्षित नव्हता. त्यामुळे आता या टी20 मालिकेत 'सूर्या' आपल्या टीकाकारांना कसे उत्तर देतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. या मालिकेदरम्यान सूर्याकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, ज्यामुळे तो रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांना मागे टाकू शकतो.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्याच्या बॅटने आतापर्यंत जलवा दाखवला आहे. तो 'मॅच विनर' खेळाडूंमध्ये गणला जातो. रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, सूर्याला त्याच्या कामगिरीमुळे या फॉर्मेटचा नियमित कर्णधार बनवण्यात आले. सूर्याकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या आगामी टी20 मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला मागे टाकून ऑस्ट्रेलियात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Most Sixes) मारणारा भारतीय खेळाडू बनण्याची संधी आहे.
दरम्यान, सध्या या यादीत सूर्यकुमार यादव शिखर धवनसोबत संयुक्तपणे पाचव्या स्थानावर असून, त्याने 9 षटकार लगावले आहेत. रोहित शर्माच्या नावावर ऑस्ट्रेलियात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 षटकार आहेत. तर, विराट कोहलीने सर्वाधिक 20 षटकार लगावले आहेत. जर सूर्याने या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 12 षटकार मारले, तर तो थेट कोहलीला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो.
ऑस्ट्रेलियात सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खूपच चांगली राहिली आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये 59.75 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. यात त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके आली आहेत, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 68 आहे. विशेष म्हणजे, या काळात त्याचा स्ट्राइक रेट 190 च्या जवळपास राहिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.