Rahul Gandhi Convicted Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Convicted: PM मोदींना 'चोर' म्हणणाऱ्या राहुल गांधींना सुरत कोर्टाने सुनावली २ वर्षाची शिक्षा

राहुल गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या आडनावावर टिप्पणी केली होती.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi Convicted in Modi defamation Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर टिप्पणी केल्याप्रकरणी सुरत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

प्रकरण 2019 शी संबंधित आहे जेव्हा वायनाडचे लोकसभा सदस्य, राहुल गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या आडनावावर टिप्पणी केली होती.

 त्यानंतर त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल म्हणाले, 'सर्व चोरांचे आडनाव मोदी असेच का असते?' या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. 

माझा हेतू चुकीचा नव्हता'

राहुल गांधी यांना दोषी ठरविल्यामुळे त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. राहुल गांधी यांनी न्यायालयात म्हटले की 'माझा हेतू चुकीचा नव्हता, माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. 

दुसरीकडे अश्विनी चौबे म्हणाल्या की, 'राहुल गांधी न्यायालयाच्या कठड्यात आहेत, ते लोकशाहीच्याही कठड्यात आहेत. या मंदिरात येऊन माफी मागण्याचे धाडसही करू शकत नाही.

  • या कलमान्वये गुन्हा दाखल

राहुल गांधी यांच्याविरोधात आयपीसी कलम 499, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ते आज तिसऱ्यांदा न्यायालयात हजर झाले आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला आणि निकाल जाहीर करण्यासाठी 23 मार्च ही तारीख निश्चित केली. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधींना दोषी घोषित करुन 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुडतरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

Horoscope: पैशांचा पाऊस पडणार! गुरुवारी अचानक होणार धनलाभ, 'या' 3 राशींचे नशीब चमकेल आणि आर्थिक स्थिती होईल मजबूत

Bihar Assembly Election: प्रशांत किशोर निवडणूक लढणार नाहीत, पक्षसंघटनात्मक कामासाठी निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT