PM Narendra Modi Security Breach

 

Dainik Gomantak

देश

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा (PM Narendra Modi Security Breach) भंग केल्याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने गुरुवारी ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांच्या याचिकेची दखल घेतली, बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळल्या. ज्या पंतप्रधान मोदींना पंजाबमधील सभेला न जाताच दिल्लीला परतावे लागले.

याचिकेत त्यांनी सुरक्षा भंगाची सखोल चौकशी, पंजाबचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यासोबतच भटिंडा जिल्हा न्यायाधीशांना पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोलिस बंदोबस्ताशी संबंधित सर्व पुरावे ताब्यात घेण्यास सांगण्यात आले आहे. याचिकेत घटनेचा अहवाल, पंजाब सरकारला योग्य निर्देश आणि जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई आणि अशा उल्लंघनांची पुनरावृत्ती रोखण्याची मागणी केली आहे.

त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याचिकाकर्त्याला याचिकेची प्रत पंजाब सरकार आणि केंद्र सरकारला देण्यास सांगितले. 42,750 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या पायाभरणीसाठी पीएम मोदी बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे पोहोचणार होते, मात्र वाटेत विरोध झाल्याने रस्ते बंद झाले, त्यामुळे त्यांना परतावे लागले.

गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. या तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष सुधीर कुमार सक्सेना, सचिव (सुरक्षा), कॅबिनेट सचिवालय असतील. त्यांच्यासोबत आयबीचे सहसंचालक बलबीर सिंग आणि एस सुरेश (आयजी) एसपीजी यांचाही चौकशी समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यात ज्या पद्धतीने त्यांची सुरक्षा ढासळली, त्याबाबत गृह मंत्रालय अत्यंत गंभीर आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय शहीद स्मारकावर पोहोचून प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे रस्त्याने जाण्याचे ठरले. त्यानंतर मार्गात निदर्शने झाल्याने रास्ता रोको करण्यात आला, त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला होता. ही अत्यंत धोक्याची बाब आहे कारण 2021 मध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबच्या सीमेवर ड्रोन पाहण्याच्या 150 घटनांची नोंद झाली आहे. अनेक ड्रोनमध्ये बॉम्ब, ग्रेनेड, पिस्तूल यांसारखी शस्त्रे भरलेली असतात, त्यावरुन कुठेही हल्ला करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT